प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न टळलं, सिद्धार्थची होणारी बायको रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या भावाच्या सिद्धार्थ चोप्राच्या लग्नासाठी खास मुंबईत आली होती. मात्र भावाचं लग्न होण्याआधीच ती पुन्हा अमेरिकेत रवाना झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 05:15 PM IST

प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न टळलं, सिद्धार्थची होणारी बायको रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली, 30 एप्रिल- बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या भावाच्या सिद्धार्थ चोप्राच्या लग्नासाठी खास मुंबईत आली होती. मात्र भावाचं लग्न होण्याआधीच ती पुन्हा अमेरिकेत रवाना झाली आहे. मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाच्या भावाचं लग्न तुर्तास पुढे ढकलण्यात आलं आहे.

रणबीरशी झालेल्या ब्रेकअपवर कतरिना म्हणाली, ‘मला मित्रांपेक्षा आता शत्रूवर जास्त विश्वास आहे’

त्याचं झालं असं की, सिद्धार्थची होणारी बायको इशिता कुमारच्या सर्जरीमुळे त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. सूत्रांनी मुंबई मिररला दिलेल्या माहितीनुसार, ‘सिद्धार्थ आणि इशिताचं लग्न मोडण्यात आल्याच्या अफवा सुरू होत्या. पण यात कोणतंही तथ्य नाही. इशिताच्या सर्जरीनंतर तिला आरामाची गरज होती. यामुळेच दोन्ही कुटुंब आता वेगळा मुहुर्त पाहत आहेत.’

कॅन्सर फ्री झाले ऋषी कपूर? भाऊ रणधीर कपूर यांनी केला खुलासा

सिद्धार्थ आणि इशिताचं लग्न याच आठवड्यात होणार होतं. प्रियांका खास या लग्नासाठी अमेरिकेतून मुंबईत आली होती. मात्र आता लग्न पुढे ढकलण्यात आल्यामुळे ती पुन्हा अमेरिकेसाठी रवाना झाली. मुंबईत असल्यामुळे तिने मतदानही केलं. सिद्धार्थ आणि इशिता यांचा फेब्रुवारीमध्ये रोका करण्यात आला होता. यावेळी प्रियांका नवरा निक जोनससोबत आली होती.

Loading...

...म्हणून मतदानासाठी शाहरुख पाच वर्षाच्या अब्रामला मुद्दाम घेऊन गेला

प्रियांकाच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तिचा ‘द स्काय इज पिंक’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. प्रियांका चोप्रा जोनस आणि सोनाली बोस यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

कोणकोणत्या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 05:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...