VIDEO सेनेत आल्यावरही ते गाणं गाणार का? प्रियांका चतुर्वेदी म्हणतात...

VIDEO सेनेत आल्यावरही ते गाणं गाणार का? प्रियांका चतुर्वेदी म्हणतात...

स्मृती इराणी यांच्याविरोधात 'क्यों की मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थी' असं गाणं म्हणणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी तसा पवित्रा कायम ठेवणार का, असं विचारल्यावर काय म्हणाल्या स्मृती इराणी?

  • Share this:

मुंबई, 19 एप्रिल : काँग्रेसच्या प्रवक्त्या म्हणून चोख कामगिरी बजावणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी काँग्रेसला हात दाखवून शिवसेनेत प्रवेश केला.अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत सत्ताधारी भाजपविरोधात बोलणाऱ्या आणि स्मृती इराणी यांच्याविरोधात 'क्यों की मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थी' असं गाणं म्हणणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी तसा पवित्रा कायम ठेवणार का, असं विचारल्यावर प्रियांका म्हणाल्या, शिवसेनेनं गेल्या पाच वर्षांत सरकारच्या चुकीच्या धोरणांचा नेहमीच विरोध केला. सत्तेत असूनही चुकीच्या धोरणांना विरोध केला गेला आहे. त्यामुळे तो प्रश्न नाही. 'गाना तो मैं गाती रहूंगी', असं उत्तर त्यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले असताना काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका गांधींच्या राजीनाम्याने मोठी खळबळ उडाली. प्रियंका चतुर्वेदी यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. पक्षात गुंडांना प्राधान्य दिले जात असल्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

प्रियांका चतुर्वेदींचं गाणं गाजलं

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवरूनच प्रियांका यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करण्यात आली. प्रियांका चतुर्वेदी अगदी काही दिवसांपूर्वी चर्चेत आल्या होत्या, ते त्यांनी पत्रकार परिषदेत गायलेल्या एका विडंबन काव्यामुळे.

...म्हणून काँग्रेस सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला : प्रियंका चतुर्वेदी

करकरेंबाबत साध्वींच्या वक्तव्यावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

SPECIAL REPORT : 'क्योंकि स्मृती इराणी कब ग्रॅज्युएट थी?'

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांन उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण बारावी उत्तीर्ण असल्याचं म्हटलं आहे. इराणी यांनीच मागच्या निवडणुकीच्या वेळी आपण पदवीधर असलल्याचं जाहीर केलं होतं आणि प्रतिज्ञापत्रातही तसा उल्लेख केला होता. यावरून काँग्रेसने इराणी यांना लक्ष्य केलं. स्मृती इराणींच्या पदवी घोटाळ्याविषयी पत्रकार परिषद घेण्यासाठी काँग्रेसतर्फे प्रियांका चतुर्वेदी यांनाच पाचारण करण्यात आलं होतं.

स्मृती इराणी यांच्या अभिनय कारकीर्दीत गाजलेल्या क्यों की सांस भी कभी बहु थी या मालिकेच्या टायटल साँगची नक्कल करत क्यों की मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थी, असं विडंबन पत्रकार परिषदेत गायलं होतं. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता.

First published: April 19, 2019, 6:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading