News18 Lokmat

प्रिया वॉरियर व्हिडिओ पुन्हा व्हायरल, आता डोळ्यांमुळे नाही तर ‘KISS’ मुळे

यात प्रिया तिचा को-स्टार रोशन अब्दुल रउफसह किसिंग सीन देताना दिसत आहे. दोघंही शाळेच्या गणवेशात दिसत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 7, 2019 05:01 PM IST

प्रिया वॉरियर व्हिडिओ पुन्हा व्हायरल, आता डोळ्यांमुळे नाही तर ‘KISS’ मुळे

एका रात्रीत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे यावेळी ती डोळा मारण्यामुळे चर्चेत आली नसून किसींग सीनमुळे चर्चेत आली आहे.

येत्या १४ फेब्रुवारीला प्रियाचा उरु उदार लव हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यात प्रिया तिचा को-स्टार रोशन अब्दुल रउफसह किसिंग सीन देताना दिसत आहे. दोघंही शाळेच्या गणवेशात दिसत आहेत. या सिनेमाचा हाच सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याच सिनेमातील डोळा मारण्याच्या सीनने ती एका रात्रीत स्टार झाली होती. जम्मू- काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळेच प्रियाच्या त्या अभिनयाने घायाळ झाले होते.

गेल्या वर्षी व्हेलेंटाईन डेच्या काळातच तिचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. मनिक्य मलाराया पूर्वी हे गाणं याच काळात प्रदर्शित झालं होतं. तिच्या डोळा मारण्यावर अनेक मीम्स तयार झाले होते. अनेक सेलिब्रिटींनी तिच्या या स्टाइलला रीक्रिएटही केलं होतं.

उरू अदार लव्ह हा सिनेमा एक रोमँटिक ड्रामा आहे. शाळेच्या प्रेमकथेवर हा सिनेमा आधारित आहे. मल्याळम सिनेमा तेलगू आणि कन्नड भाषेतही डब करण्यात आला आहे. हा प्रियाचा पहिला सिनेमा आहे. देशभरात प्रिया वॉरिअर आणि अब्दुलची केमिस्ट्री लोकांना आवडत आहे.

Loading...


दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रिया प्रकाश वॉरियरच्या आगामी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरमध्ये तिने श्रीदेवींची व्यक्तिरेखा साकारली आहे. प्रिया प्रकाशचा ‘श्रीदेवी बंगला’ (Sridevi Bungalow) या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. टीझरमध्ये प्रियाने श्रीदेवी या व्यक्तिरेखेच्या अनेक छटा दाखवल्या आहेत. तर टीझरच्या शेवटी बाथ टबमध्ये झालेल्या मृत्यूबद्दलही दाखवले आहे. या सिनेमात प्रियाने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

न्यूज१८ सोबत झालेल्या एका मुलाखतीत प्रियाला ती श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा करतेस का असा प्रश्न विचारला असता तिने ‘सिनेमा प्रदर्शित होण्यापर्यंत प्रतीक्षा करा असं उत्तर दिलं होतं. सिनेमाची उत्सुकता टिकून राहावी यासाठी मी सिनेमाबद्दल अधिक बोलणार नाही मात्र यात मी श्रीदेवींची व्यक्तिरेखा साकारत आहे हे मात्र नक्की.’ आता या सिनेमाविरुद्ध बोनी कपूर यांनी निर्मात्यांना कायदेशीर नोटिस पाठवली आहे. असं म्हटलं जातं की, प्रिया प्रकाशचा हा सिनेमा श्रीदेवी यांच्या कुटुंबाची परवानगी न घेताना बनवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2019 05:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...