मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Air India च्या खासगीकरणाची प्रक्रिया वेगात; 'या' दोन कंपन्यांमध्ये चुरस; लवकरच विजेत्या बोलीची होणार घोषणा

Air India च्या खासगीकरणाची प्रक्रिया वेगात; 'या' दोन कंपन्यांमध्ये चुरस; लवकरच विजेत्या बोलीची होणार घोषणा

एअर इंडिया या तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या विमान कंपनीच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला केंद्र सरकारने गती दिली आहे

एअर इंडिया या तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या विमान कंपनीच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला केंद्र सरकारने गती दिली आहे

एअर इंडिया या तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या विमान कंपनीच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला केंद्र सरकारने गती दिली आहे

    नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : विविध कारणांमुळे तोट्यात असलेल्या एअर इंडियाच्या (Air India) खासगीकरणासाठीची (Privatization) प्रक्रिया सध्या सुरू आहे. सध्या तांत्रिक निविदांचं (Technical Bid for Air India) मूल्यांकन सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर आर्थिक निविदांचं (Financial Bid) मूल्यांकन केलं जाणार आहे. या सर्व प्रक्रियेची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Minister Jyotiraditya Scindia) यांनी नुकतीच दिली आहे. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया सध्या वेगात सुरू आहे. यासाठी किती जणांनी बोली लावली आहे किंवा किती निविदा दाखल झाल्या आहेत, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे.

    एअर इंडिया या तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या विमान कंपनीच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला केंद्र सरकारने गती दिली आहे. 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी यशस्वी बोलीदाराचं नाव जाहीर करण्याच्या दिशेनं सरकार काम करत आहे. याअंतर्गत नॅशनल कॅरिअरसाठी आर्थिक बोली उद्या म्हणजेच 29 सप्टेंबर 2021 रोजी सुरू केली जाऊ शकते. बोली किमतीच्या 85 टक्के हिस्सा हा एअर इंडियाच्या कर्जासाठी असेल, तर 15 टक्के रोख असेल, अशी चर्चा आहे.

    हे वाचा - Breaking: महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; MPSC जारी केली यादी

    यांनी सादर केल्या आहेत आर्थिक निविदा

    या सरकारी विमान वाहतूक कंपनीसाठी अनेक निविदा प्राप्त झाल्या आहेत. यात टाटा समूहाची (Tata Group tender for AI) होल्डिंग कंपनी असलेली टाटा सन्स (Tata Sons) आणि स्पाइसजेटचे (Spice jet) प्रमुख अजय सिंह यांनी एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी बोली लावली आहे. प्राप्त झालेल्या तांत्रिक निविदांचं मूल्यांकन केलं जात असून, ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आर्थिक निविदा उघडल्या जातील असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Minister Jyotiraditya Scindia) यांनी 25 सप्टेंबर 2021 रोजी स्पष्ट केलं होतं.

    हे वाचा - महाभयंकर! गुलाबनंतर आता 'शाहीन'चा धोका; महाराष्ट्र आणि गुजरातला IMD चं अलर्ट

    व्यवहार सल्लागार करणार बोलींची पडताळणी

    केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कर्जाच्या संकटात फसलेल्या एअर इंडियासाठी सरकारकडे किती निविदा दाखल झाल्या आहेत, हे सांगण्यास मात्र नकार दिला होता. सरकारला सीलबंद पाकिटांमध्ये तांत्रिक आणि आर्थिक बोली प्राप्त झाल्या आहेत. सध्या तांत्रिक निविदांचं मूल्यांकन सुरू आहे. हे मूल्यांकन झाल्यानंतर आर्थिक निविदा खुल्या केल्या जातील. त्यानंतर आर्थिक निविदांचं मूल्यमापन अज्ञात राखीव किमतीच्या आधारे केलं जाईल. त्यानंतर सर्वाधिक रकमेची बोली स्वीकारली जाईल. सर्वांत प्रथम व्यवहार सल्लागार निविदेची पडताळणी करतील. यानंतर संबंधित शिफारस मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवली जाईल, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Air india