सागर वैद्य, नवी दिल्ली,ता.12 जुलै : बिलाच्या पैशासाठी रूग्णाचा मृतदेह नातेवाईकांना स्वाधिन न करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालयांच्या विरोधात गुन्हे दाखल करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेय. सवलतीत जमिनी मिळालेल्या रुग्णालयांनी गरजूंना मोफत सेवा द्यावी असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, त्यामुळं रुग्णांची लुट करणाऱ्या रुग्णालयांना दणका बसला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक विशेष याचिका दाखल केली होती त्यावर कोर्टानं हा निर्णय दिला आहे. दिल्लीच्या जमिन आणि विकास अधिकाऱ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या 2007च्या निर्णयाचा हवाला देऊन सवलतीच्या दरात जमिनी घेतलेल्या रुग्णालयांनी गरजूंवर मोफत उपचार करावे असे आदेश 2 फेब्रुवारी 2012ला काढले होते. या आदेशाला काही धर्मदाय रुग्णालयांनी विरोध केला आणि उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानं दिल्लीतल्या अधिका-यांचे ते परीपत्रक रद्द ठरवले होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात विशेष याचिका दाखल करुन आव्हान दिलं होत.
या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं रुग्णांची लूट करणाऱ्या धर्मदाय रुग्णालयांना चांगलच धारेवर धरलंय. सुप्रीम कोर्टाचे हे आदेश दिल्लीतल्या परीपत्रकाबद्दल असले तरी अशाच पध्दतीनं देशभरात सवलतीत जमिनी घेतलेल्या रुग्णालयांनाही हा आदेश लागू होत असल्याने नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय.
काय म्हणालं सुप्रीम कोर्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Doctor, Private hospitals, Supreme court, Treatment