मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

भाजपचे जशास तसे उत्तर, फडणवीसांवर केलेले पृथ्वीराज चव्हाणांचे आरोप काढले खोडून!

भाजपचे जशास तसे उत्तर, फडणवीसांवर केलेले पृथ्वीराज चव्हाणांचे आरोप काढले खोडून!

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 13 जुलै : केंद्र सरकारने केलेल्या जातीनिहाय जनगणनेवरून वाद पेटला आहे. काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( prithviraj chavan) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्यावर केले आरोपांचे खंडन करत पुरावेच सादर केले आहे. काँग्रेस पक्षात असल्यामुळे ‘खोटे बोल पण रेटून बोल' हीच  पृथ्वीराज चव्हाण यांची रित आहे' अशी टीकाही भाजपने केली.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी यूपीए सरकारच्या काळात जातीनिहाय आणि आर्थिक जनगणनेमध्ये (एसईसीसी) 8 कोटी चुका आहे. राज्यात  69 लाख चुका आहेत, असा दावा केला होता. त्यानंतर आज पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्वीट करून एक पत्रच प्रसिद्ध करत पोलखोल केली होती. त्यावर भाजपने ट्वीट केले आहे.

काँग्रेस पक्षात असल्यामुळे ‘खोटे बोल पण रेटून बोल' हीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची रित आहे. स्वत:च्या चुका झाकण्यासाठी वेगळीच भूमिका घेत आधीच दिशाभूल करून मोकळे व्हायचे, ही त्यांची कार्यपद्धती राज्याला परिचित आहे. मुळात केंद्र सरकारने राज्यांना जे पत्र 3 जुलै 2015 रोजी पाठविले, त्या एसईसीसी डेटामध्ये 8.19 कोटी चुका सांगितल्या होत्या. 6.73 कोटी चुकांच्या दुरूस्तीनंतर सुद्धा 1.45 कोटी चुका शिल्लक राहिल्या, असं म्हणत द हिंदू दैनिकाच्या वेबसाईटची लिंक शेअर केली आहे.

तसंच, राज्यनिहाय चुकांची वर्गवारी पाहिली तर सर्वाधिक 69.1 लाख चुका या महाराष्ट्रातील आहे. इतर राज्यांतील चुकांचे प्रमाण हे 1 ते 14 लाख दरम्यान आहे. म्हणजे 14 लाखांवर चुका कुठल्याच राज्यात नाही, असं सांगत बिझनेट स्टंडर्स दैनिकांची लिंक शेअर केली आहे.

तसंच, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात जी आकडेवारी गोळा झाली, त्यातच सर्वाधिक चुका कशा? लोकांची दिशाभूल करताना आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न न करता या प्रश्नाचे उत्तर त्यांनी आधी दिले पाहिजे' असा थेट  सवाल भाजपने विचारला आहे.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Prithviraj Chavan