Home /News /news /

येरवडा कारागृहातील कैद्यांची कमाल, 'या' व्यवसायातून मिळवले 8 कोटी

येरवडा कारागृहातील कैद्यांची कमाल, 'या' व्यवसायातून मिळवले 8 कोटी

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या कारागृहाचे वार्षिक उत्पन्न 7 ते 8 कोटी रुपये आहे.

    पुणे, 26 जानेवारी: कैद्यांचं पुनर्वसन आणि त्यांना सुधारण्यासाठी सर्वात मोठा उपक्रम पश्चिम महाराष्ट्रातील येडवडा कारागृहात केला जातो. या कारागृहात जवळपास 6 हजार कैदी आहेत. त्यापैकी दीड हजार दोषी कैद्यांना शिक्षा झाली आहे. चांगली वागणूक असणाऱ्या कैद्यांना ओपन जेलमध्ये पाठवण्याची सुविधा केली जाते. असे कैदी पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नयेत आणि समाजात त्य़ांना पुन्हा एकदा स्वत:चं पोट भरण्यासाठी पायावर उभं राहता यावं यासाठी काही चांगले स्किल्स शिकवले जातात. हा उपक्रम येरवडा कारागृहात राबवला जातो. कैद्यांना वेगवेगळं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांच्या कौशल्य़ाचा वापर करून त्यांना रोजगाराच्या संधीही दिल्या जातात. किंवा एखादा व्यवसाय करून घेतला जातो. असे उपक्रम फार कमी तुरूंगात चालवले जातात. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह अशा सुधारणांसाठी प्रयोगशाळा असल्याचे दिसते. या कारागृहाची कमाई कोटींमध्ये आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या कारागृहाचे वार्षिक उत्पन्न 7 ते 8 कोटी रुपये आहे. या तुरुंगातील उपक्रम राज्यातील इतर तुरुंगांमध्येही राबवले जात आहेत. हेही वाचा-Xiaomiचे मोबाईल झाले 6 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत या वेळी येरवडा कारागृहातील वरिष्ठ प्रशासनाकडूनही 100 दोषी कैद्यांना हाय सलून आणि कपडे इस्त्री करण्य़ाचं प्रशिक्षण देण्यात आलं. काही दोषी कैद्यांची निवड खुल्या कारागृहासाठी देखील करण्यात आली. तर कारागृहाजवळी दोन सलूनमध्ये नोकरी देण्यात आली आहे. तर काही कैद्यांकडून इस्त्रीची कामं करून घेतली जातात. विशेष म्हणजे येरवडा जेलबाहेर विमानतळ रोडवर दोन दुकाने आहेत. कारागृह अधिकाऱ्यांच्य़ा या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे. कारागृहातून कैद्याची सुटका झाल्यानंतर मुख्य प्रवाहात जाऊ शकतात. या कलागुणांचा वापर करून ते आपलं पोट भरू शकतील आणि समाजात पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करतील. यामुळे त्यांना चांगलं उत्पन्न मिळेल आणि पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाहीत असा विश्वास येरवडा प्रशासन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या सगळ्या कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी एक वेगळी यंत्रणा कार्य करत असते. यामध्ये कैद्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन चांगला व्यवसाय किंवा नोकरी करावी हा हेतू असतो. अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवणारा हे एकमेव कारागृह असल्याचं सांगितलं जात आहे. हेही वाचा-गुगलवरून नंबर घेऊन बैलासाठी मागितली मदत आणि...
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या