जळगाव जेलमध्ये कैद्यांचा राडा, एक गंभीर जखमी

जळगाव जेलमध्ये कैद्यांचा राडा, एक गंभीर जखमी

यातील एकाने लोखंडी पट्टी घेवून त्यांच्या तोंडावर व कंबरेवर वार करत गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत शुभमला जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

  • Share this:

राजेश भागवत, जळगाव 15 जानेवारी : जुना वाद उकरून काढत कैद्यांनी जळगाव जिल्हा जेलमध्ये राडा घातला. तीन कैद्यांनी एका कैद्यावर प्राणघातक हल्ला चढवत लोखंडी पट्टीने त्याला जखमी केलं. जिल्हा कारागृहात सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून अशा प्रकारे हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालीय. जेल प्रशासन मात्र ढिम्म असल्याचा प्रकार वारंवार येथे घडत आहे. याप्रकरणी तीन कैद्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी कैदीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

शुभम मनोज देशमुख उर्फ शिवम उर्फ दाउद (वय 21) हा गेल्या वर्षभरापासून एका प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कोठडीत आहे. त्याच्यासोबत इतर गुन्ह्यात असलेले अट्टल गुन्हेगार तीन कैदी राकेश वसंत चव्हाण, राजू वसंत चव्हाण हे दोघे भाऊ आणि राहूल पंढरीनाथ पाटील या तिघांनी जुन्या वादातून भांडण केलं.

विक्रम गोखले म्हणाले, राष्ट्रवादीत एकाच नेत्याकडे 'व्हिजन', आणि तो म्हणजे...

आज सकाळी साडेसात वाजता उठल्यानंतर शुभम देशमुखच्या पाठीमागून येत बेदम मारहाण केली. यातील एकाने लोखंडी पट्टी घेवून त्यांच्या तोंडावर व कंबरेवर वार करत गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत शुभमला जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या भांडणामुळे इतर कैद्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jalgaon
First Published: Jan 15, 2020 09:16 PM IST

ताज्या बातम्या