ट्रॅकपॅन्टच्या लेसनंच तुरुंगात कैद्यानं घेतला गळफास, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

ट्रॅकपॅन्टच्या लेसनंच तुरुंगात कैद्यानं घेतला गळफास, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

अंकित रामटेके असं आत्महत्या केलेल्या कैद्याचं नाव आहे. लहान भावाचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप होता.

  • Share this:

हैदर शेख(प्रतिनिधी),

चंद्रपूर, २6 डिसेंबर: चंद्रपूर जिल्हा कारागृहात (chandrapur District jail) एका कैद्यानं गळफास (Prisoner suicide) घेवून आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अंकित रामटेके असं आत्महत्या केलेल्या कैद्याचं नाव आहे. लहान भावाचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप होता.

धक्कादायक म्हणजे अंकित यांने ट्रॅकपॅन्टच्या लेसनं कारागृहातील बॅरेकमध्ये गळफास घेतला. त्याचा मृतदेह गजाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं कारागृह प्रशासन हादरलं आहे.

हेही वाचा.. बालसुधार गृहाच्या जवळच झाला स्फोट, थोडक्यात बचावली मुले-मुली

मिळालेली माहिती अशी की, अंकित रामटेके याला जुलै 2020 मध्ये दुर्गापूर येथे अनिकेत रामटेके या आपल्या लहान भावाचा खून केल्याच्या आरोपात अटक झाली होती. पोलीस पथक, कारागृह अधिकारी, न्यायदंडाधिकारी यांच्या हजेरीत मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.

कोणाला दिसू नये म्हणून चेहऱ्यावर घेतला टॉवेल...

चंद्रपूर जिल्हा कारागृहात शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. अंकित रामटेके याने आजूबाजूला जवळपास 100-150 कैदी असताना आत्महत्या कशी केली? असा प्रश्न कारागृह प्रशासनाला पडला आहे. अंकित याने ट्रॅकपॅन्टच्या लेसचा गळफास घेण्यासाठी वापर केला. बॅरेकमध्ये गजाला लेस अडकवून त्यानं गळफास घेतला. विशेष म्हणजे गळफास घेताना आपण कोणाला दिसू नये, यासाठी अंकितनं गजाला टॉवेल आणि शर्ट लटकावला होता. थोड्या वेळानं टॉवेल पडल्यावर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा...तुला नांदायचं नाही का? म्हणत झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीनं केले सपासप वार

दुर्गापूर येथील राहाणाऱ्या अंकित याच्यावर त्याचा लहान भाऊ अनिकेत रामटेके यांच्या निर्घृण हत्या केल्याचा आरोप होता. ही घटना गेल्या जुलै महिन्यात घडली होती. त्यानंतर अंकित रामटेके याची रवानगी जिल्हा कारागृहात झाली होती.

Published by: Sandip Parolekar
First published: December 26, 2020, 9:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या