Home /News /news /

पंतप्रधान मोदींची 'भारत बायोटेक'ला भेट, Covid Vaccine वर चर्चा करून शास्त्रज्ञांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींची 'भारत बायोटेक'ला भेट, Covid Vaccine वर चर्चा करून शास्त्रज्ञांना दिल्या शुभेच्छा

'भारत बायोटेक'ला भेट देऊन त्यांनी स्‍वदेशी कोविड-19 व्हॅक्‍सिनबाबत माहिती जाणून घेतली.

    नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर: देशात झपाट्यानं पसरलेल्या कोरोना संसर्गानंतर (Coronavirus) आता प्रत्येकाला कोरोना व्हॅक्सिनची (Corona Vaccine) प्रतिक्षा लागली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही आता कोरोना व्हॅक्सिनवर लक्ष केंद्रित केलं आहे. याचसाठी पंतप्रधान मोदी शनिवारी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्याचा दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी यांनी अहमदाबाद येथे कोविड व्हॅक्सिन सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादच्या झायडस कॅडिलाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आढावा घेतला आणि ते आता हैदराबादच्या पोहोचले आहेत. हेही वाचा...येत्या काही महिन्यांत फास्टटॅग सक्तीचा होणार; नितीन गडकरी यांचे संकेत पंतप्रधान मोदी यांनी हैदराबादेतील जीनोम खोऱ्यातील 'भारत बायोटेक'ला भेट देऊन त्यांनी स्‍वदेशी कोविड-19 व्हॅक्‍सिनबाबत माहिती जाणून घेतली. येथून आता पंतप्रधान पुण्याकडे रवाना होणार आहेत. पीएम मोदी यांनी ट्वीट करून शास्त्रज्ञांना आतापर्यंत झालेल्या परीक्षणासाठी, त्याच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अहमदाबाद आणि हैदराबाद मधील इतर दोन कंपन्यांकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीची प्रगतीची माहिती घेत आहेत. सर्वसामान्यांपर्यंत ही लस कधी पर्यंत पोहोचेल याबाबत लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट भेट देणार आहेत. पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कोरोना लशीची आढावा घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटला आज सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. पंतप्रधान पुणे दौरा (सुधारीत वेळापत्रक) दु. 3:50 वा. पुणे विमानतळावर आगमन दु. 3:55 वा. हेलिकॉप्टरने सिरम इनस्टिट्यूट(मांजरी)कडे रवाना दु. 4:15 वा. मांजरी हेलिपँडवर उतरणार, सिरम इनस्टिट्यूटकडे रवाना दु. 4:25 वा. सिरम इनस्टिट्यूटमध्ये आगमन दु. 4:25 ते संध्या. 5:25 वाजेपर्यंत सिरम इनस्टिट्यूटची पाहणी संध्या. 5:30 वा. पुणे विमानतळाकडे रवाना संध्या. 5:55 वा. पंतप्रधान दिल्लीला रवाना होणार महत्त्वाचे अनेक नेते उपस्थित राहणार नाहीत! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौरा स्वागतासाठी मुख्यमंत्री, राज्सपाल, विरोधी पक्ष नेते उपस्थितीत राहणार नाहीत. पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या विनंतीनुसार कोरोना काळात अल्प कालावधी भेट असल्याने स्वागतासाठी येऊ नये असा निरोप आल्याची माहिती आहे. राजशिष्टारानुसार राज्यपाल, मुख्यमंत्री हे राज्यात पंतप्रधान आल्यावर त्यांचं स्वागत करतात.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, PM Naredra Modi

    पुढील बातम्या