केसरींना उचलून फेकणाऱ्या काँग्रेसला बोलण्याचा अधिकार नाही - मोदी

केसरींना उचलून फेकणाऱ्या काँग्रेसला बोलण्याचा अधिकार नाही - मोदी

'सीताराम केसरी अध्यक्ष असतांना त्यांना दोन वर्षही पूर्ण करू दिली गेली नाहीत. अतिशय अपमानास्पद पद्धतीने त्यांना काँग्रेसने पदावरून दूर केलं.'

  • Share this:

रायपूर, ता. 18 नोव्हेंबर : घराणेशाहीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीकेची धार कमी झालेली नाही. छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रचार सभेत त्यांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिलं. सीताराम केसरी अध्यक्ष असतांना त्यांना दोन वर्षही पूर्ण करू दिली गेली नाहीत. अतिशय अपमानास्पद पद्धतीने त्यांना काँग्रेसने पदावरून दूर केलं. त्यांना बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आलं होतं. नंतर सोनिया गांधींची अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी केली.

छत्तीसगड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपला. दोन दिवसांपूर्वी मोदींनी काँग्रेसला आव्हान देत गांधी घराण्याशिवाय एखाद्या व्यक्तीची पक्षाध्यक्षपदावर पाच वर्षांसाठी नियुक्ती करा असं आव्हान दिलं होतं. त्याला उत्तर म्हणून ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आत्तापर्यंत गांधी घराण्याशीवाय अध्यक्षपदावर राहिलेल्यांची नावं ट्विटरवर जाहीर केली होती.

त्याचा समाचार घेताना मोदी म्हणाले, घराण्याच्या निष्ठावंतांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र खरं उत्तर दिलंच नाही. सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांना अतिशय अपमानास्पद पद्धतीने काढण्यात आलं आणि सोनियांची वर्णी त्या जागी लावण्यात आली ही वस्तुस्थिती असताना काँग्रेस कुठल्या तोंडाने आम्हाला शिकवत आहे असा सवालही त्यांनी केला.

चार वर्षांचा हिशेब मागणाऱ्या काँग्रेसने आधी चाळीस वर्षांचा हिशेब द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. काँग्रेसला एका घराण्याशीवाय दुसरं काहीच दिसत नाही. हे देशाला परवडणारं आहे का असा सवालही त्यांनी केला.

VIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का

 

 

First published: November 18, 2018, 5:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading