मोदींचे धक्कातंत्र, याआधीही केल्या होत्या 'या' मोठ्या घोषणा

मोदींचे धक्कातंत्र, याआधीही केल्या होत्या 'या' मोठ्या घोषणा

बुधवारी पंतप्रधानांनी एक ट्वीट करत देशाला महत्त्वपूर्ण संदेश देणार असं म्हटलं. त्यानंतर मोदी आता कोणता मोठा निर्णय घेणार यावर वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आणि संपूर्ण देशात मोदी काय बोलणार यावर चर्चा सुरू झाली. बुधवारी पंतप्रधानांनी एक ट्वीट करत देशाला महत्त्वपूर्ण संदेश देणार असं म्हटलं. त्यानंतर मोदी आता कोणता मोठा निर्णय घेणार यावर वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

यावेळी मोदींनी भारताच्या नव्या पराक्रमाची घोषणा केली आहे आणि भारतीय शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. पण आधीही पंतप्रधानांनी अशा मोठ्या घोषणा केल्या आहेत.

याआधी 3 ऑगस्ट 2015ला भारत सरकारकडून सोशल मीडियाद्वारे मोठी संदेश देण्यात आला होता. त्यात असं सांगण्यात आलं होतं की, भारत सरकार एक मोठी घोषणा करणार आहे. त्यावेळीदेखील संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती.

त्यानंतर काही वेळात भारत सरकार आणि नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड या NSCN (IM)ने  ऐतिहासिक 'फ्रेमवर्क समझोता'ची घोषणा करण्यात आली होती.

या घोषणेनंतर नागालँडच्या नागरिकांनी यांचं स्वागत केलं होतं. भारताच्या या निर्णयाचं इतर देशांनीही कौतुक केलं होतं.

नोटबंदीवेळीदेखील असंच झालं होतं

नोटबंदी झाली त्यावेळीदेखील संदेश देण्यात आला होता की देशाचे पंतप्रधान थोड्याच वेळात महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहेत. यावेळीदेखील देशात अनेक चर्चांना उधाण आलं.  8 नोव्हेंबर 2016च्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली.

व्यवहारातून 500 आणि 1000 च्या नोटा बंद होणार असल्याची घोषणा झाली. यावेळी देशात एकच खळबळ उडाली होती.

पंतप्रधानांची पुन्हा मोठी घोषणा 'भारत अंतराळ क्षेत्रातला महाशक्ती'

अमेरिका, रशिया, चीननंतर अंतराळातील महाशक्ती ठरलेला भारत चौथा देश ठरला आहे. लो अर्थ ऑरबीटला भारताने पाडलं. फक्त तीन मिनिटांत ही कामगिरी पुर्ण करण्यात आली. मिशन शक्तीच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत A सॅटने ही कामगिरी केली. याबद्दल मोदींनी या मोहिमेशी संबंधित सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण तुम्ही पाहिलं नाही का? येथे पाहा UNCUT

First published: March 27, 2019, 1:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading