पंतप्रधान मोदी आज उद्धव ठाकरेंशी बोलणार, ममतादीदींना निमंत्रण नाहीच!

पंतप्रधान मोदी आज उद्धव ठाकरेंशी बोलणार, ममतादीदींना निमंत्रण नाहीच!

पंतप्रधान कार्यालयाकडून आज बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. यात केवळ 6 मुख्यमंत्र्यांना बोलवण्यात आले आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून : कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगात भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. आज पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी चर्चा करणार आहे. परंतु, या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बोलावण्यात आलं नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आज ज्या राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे, अशा राज्यांसोबत पंतप्रधान मोदी दुपारी 3 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहे. यात आज सर्वात पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहे.

देशातील मृतांचा आकडा 12 हजारांच्या घरात, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर

पंतप्रधान कार्यालयाकडून आज बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. यात केवळ 6 मुख्यमंत्र्यांना बोलवण्यात आले आहे.  यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक बिहार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहे. परंतु, या यादीतून पश्चिम बंगालला वगळण्यात आले आहे.

पश्चिम बंगलामध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. पण, या चर्चेसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निमंत्रित करण्यात आले नाही. ममतादीदींनीही केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या या वागणुकीमुळे बैठकीकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला. या पंतप्रधानांसोबत चर्चेसाठी राज्यातून प्रतिनिधी हजर राहिल अशी भूमिका ममतादीदींनी घेतली होती. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी हे पश्चिम बंगाल वगळता इतर पाच राज्यांशी संवाद साधणार आहे.

क्रुझर आणि मारुती सुझुकी इकोची समोरासमोर धडक, गाडी जळून खाक, पाहा हा VIDEO

कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर

दरम्यान, भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या घरात आहे. गेल्या 24 तासांत 10 हजार 974 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 2003 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 86 हजार 935 झाला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 11 हजार 903 झाला आहे. यासह भारताचा मृत्यूदर 2.9% वरून 3.4 झाला आहे.  इतर देशांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या एकूण आकडेवारीनुसार चौथ्या क्रमांकावर आहे. भारताच्या आधी अमेरिका, ब्राझील, रशिया यांच्या क्रमांक लागतो. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 17, 2020, 10:32 AM IST
Tags:

ताज्या बातम्या