Home /News /news /

राज्यात प्राथमिक शाळा केव्हा सुरू होणार? शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

राज्यात प्राथमिक शाळा केव्हा सुरू होणार? शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष नियमावलीही जारी करण्यात आली आहे. या नियमांचं पालन करणं शाळांसाठी बंधनकारक असणार आहे.

शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष नियमावलीही जारी करण्यात आली आहे. या नियमांचं पालन करणं शाळांसाठी बंधनकारक असणार आहे.

शाळा सुरू करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेण्यात येईल. नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे.

    मुंबई 9 डिसेंबर: महाराष्ट्रातील शैक्षणिक (Maharashtra Education) संस्थेतील काही जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. सुदैवाने कोरोनाचा कोणत्याही प्रकारच्या प्रार्दुभावाने विद्यार्थी व शिक्षक (Students and Teachers) संक्रमित (Covid-19) झाले नाही ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसारच राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली. शिक्षण मंत्री पुढे म्हणाल्या, शाळा सुरू करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेण्यात येईल. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा विचार करता येईल . केंद्र व राज्य शासनाच्यावतीने जाहीर केलेल्या आरोग्य विषयक सूचनांचे पालन करूनच नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील, कारण हे विद्यार्थी प्राथमिक विभागातील मुलांपेक्षा अधिक जागरूक व सजग असतात. लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक सुचनांचे पालन करणे तितकेसे सहज शक्य नसल्याने निदान सध्या तरी आम्ही पहिली ते आठवी पर्यंतच्या प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही भूमिका मांडली नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा व आरोग्य विषयक बाबींचा विचार करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हीत लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल अशी माहितीही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. शेतकरी आंदोलनास मोदी सरकारच जबाबदार, भाजपच्या माजी मंत्र्यांची टीका राज्यातील सुरू झालेल्या शाळा मधील विद्यार्थी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि विद्यार्थी व शिक्षकांचा आत्मविश्वास वाढत आहे. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू असलेल्या शैक्षणिक वर्षांचे महत्त्व लक्षात घेऊन प्राधान्याने त्यांचा अभ्यास व परीक्षा पध्दतीचा विचार शिक्षण विभाग करत आहे ज्यामुळे पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. मुंबई विद्यापीठाने First Year च्या परीक्षांसाठी दिली नवी डेडलाइन या संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण तज्ज्ञांशी विचार विनिमय चालू आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा या नेहमीच्या पद्धतीनेच परंतु काहीशा उशिरा म्हणजे  एप्रिल महिन्याच्या शेवटच्या हप्तात व मे महिन्याच्या पहिल्या हप्त्या या काळात होण्याची शक्यता आहे. सध्या जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे. शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचा सकारात्मक दृष्टिकोन, व सरकारचे प्रयत्न यामुळे आपण कोरोनाच्या संकटावर मात करून भविष्यातील वाटचाल उज्ज्वल करू असा आत्मविश्वासही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या