S M L

दुधाच्या दरात 3 रुपयांची वाढ,राजू शेट्टी आंदोलनावर ठाम

मात्र, दुध दरात ३ रूपये वाढ केलीये. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे कोणतेही पुरावे आलेले नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2018 10:11 AM IST

दुधाच्या दरात 3 रुपयांची वाढ,राजू शेट्टी आंदोलनावर ठाम

कोल्हापूर, 14 जुलै : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 तारखेपासून मुंबईला दूधपुरावठा रोखण्यासाठीच आंदोलन घोषित केलंय. शेतकऱ्यांना लिटरमागे 5 रुपयांची दरवाढ देण्याची मागणी त्यांनी केलीये. मात्र आंदोलनाच्या दोन दिवस आधीच पुण्यातल्या प्राईड हॉटेलमध्ये खाजगी आणि सहकारी दूध संघाच्या प्रतिनिधींची बैठक पार पडलीये. या बैठकीत शेतकऱ्यांना लिटर मागे तीन रुपये वाढवून देण्याचा निर्णय झालाय.

माझ्या वडिलांचं देशासाठीच योगदान न विसरणारं,'सेक्रेड गेम्स' वादावर राहुल गांधींचं टि्वट

सरकार ने दूध भुकटी ला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यामुळे टप्प्या टप्प्याने दूध दरवाढ करता येईल अशी भूमिका या दूध संघांनी घेतलीय. जीएसटी मध्ये सूट दिल्यानंतर पुढची दरवाढीचा घोषणा करू असही या बैठकीत ठरलंय.मॉडेल म्हणाली – तर त्याने मला संपवून टाकले असते

 मात्र, दुध दरात ३ रूपये वाढ केलीये. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे कोणतेही पुरावे आलेले नाही. त्यामुळे राजू शेट्टींनी आंदोलनावर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यातील अनेक दुध संघाकडे याबाबत विचारणा केली असता हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले आहे. यामुळे उद्या मध्यरात्रीपासून सुरू होणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन चालूच ठेवावे यामध्ये कोणताही बदल झालेला नाही असं राजू शेट्टींनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2018 11:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close