एलपीजी सिलेंडर 32 रूपयांनी महागणार

एलपीजी सिलेंडर 32 रूपयांनी महागणार

एलपीजीला 5 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये ठेवलंय. आतापर्यंत काही राज्यांमध्ये 2 ते 3 टक्के वॅट किंवा इतर काही कर काही राज्यांमध्ये लावले जात होते.

  • Share this:

3जुलै: जीएसटी लागू झाल्याचा फटका मध्यमवर्गाला चांगलाच बसलाय.अनेक गरजेच्या वस्तू महागल्यात.आता यातच भर म्हणून एलपीजी सिलेंडरही महागणार आहेत तेही एक दोन रूपयांनी नाही तर तब्बल 32 रूपयांनी.

एलपीजीला 5 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये ठेवलंय. आतापर्यंत काही राज्यांमध्ये 2 ते 3 टक्के वॅट किंवा इतर काही कर काही राज्यांमध्ये लावले जात होते. तसंच दोन वर्षांच्या रजिस्ट्रेशन आणि इन्स्टॉलेशन चार्जेसही भरावे लागणार आहेत . हे इन्स्टॉलेशन आता नव्यानं करावं लागणार आहे. तसंच सरकारनं सबसिडीची रक्कमही कमी केलीय. त्यामुळे सिलेंडरच्या किंमती अधिकच वाढणार आहेत.

तज्ज्ञांच्या मते या साऱ्याची गोळाबेरीज करता सरासरी 32 रूपयांनी सिलेंडर महागणार आहे.

याशिवाय विनाअनुदानित सिलेंडर जीएसटीच्या 18टक्के स्लॅबमध्ये ठेवलंय.

First published: July 3, 2017, 12:02 PM IST

ताज्या बातम्या