मीरा कुमार यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

मीरा कुमार यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

माजी लोकासभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या नावावर यूपीएनं शिक्कामोर्तब केलंय.

  • Share this:

22 जून : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखेर यूपीएने आपला उमेदवार निश्चित केलाय. माजी लोकासभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय.

भाजपने राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा करून विरोधकांची कोंडी केली. भाजपने कोविंद यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर लगेच यूपीएनेही तातडीने बैठक घेऊन उमेदवाराच्या नावाची चाचपणी सुरू केली. मीरा कुमार यांचं नाव पुढे करण्यात आलं.

पण त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. याबद्दल 22 जूनला अधिकृत घोषणा करण्यात येणार होती. आज ठरल्याप्रमाणे मीरा कुमार यांच्याच नावाची घोषणा झाली. मध्यंतरी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार यांचंही नाव पुढे आलं होतं. पण अखेरीस मीरा कुमार यांचं नाव यूपीएने पुढे केलंय.

First published: June 22, 2017, 6:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading