Home /News /news /

कोरोना: US मध्ये भयावह परिस्थिती, गर्भवती महिलांवर न्यूयॉर्क सोडून जाण्याची वेळ

कोरोना: US मध्ये भयावह परिस्थिती, गर्भवती महिलांवर न्यूयॉर्क सोडून जाण्याची वेळ

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीत अमेरिकेने चीन आणि इटलीलाही मागे टाकलं आहे. दरम्यान, अमेरिकेत कोरोना विषाणूचे भयावह रूप अद्याप समोर आलेले नाही, असे आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे.

    न्यूयॉर्क, 02 एप्रिल : कोरोनाचा फैलाव जगभर वाढत आहे. कोरोनाने अमेरिकेत तर हाहाकार माजवला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची एकूण प्रकरणे 2 लाखांच्या वर गेली आहेत आणि 4500 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. तिथली परिस्थिती अशा ठिकाणी पोहोचली आहे की तिथे युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि चक्क गर्भवती महिलांना शहर सोडण्याची वेळ आली आहे. खरंतर, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीत अमेरिकेने चीन आणि इटलीलाही मागे टाकलं आहे. दरम्यान, अमेरिकेत कोरोना विषाणूचे भयावह रूप अद्याप समोर आलेले नाही, असे आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही येत्या दोन आठवडे अवघड असल्याचं सांगितलं आहे. न्यूयॉर्क शहर, जे कोरोनाच्या प्रकरणांचं मुख्य केंद्र बनलं आहे. येथून गर्भवती महिला इतर सुरक्षित शहरांकडे धाव घेत आहेत. हे वाचा - कोरोना उपचारासाठी 30 विशेष रुग्णालयांची घोषणा, कोणतं आहे तुमच्या जवळचं हॉस्पिटल? न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कची एक महिला 31 आठवड्यांची गर्भवती आहे. ती न्यूयॉर्कहून कोलोरॅडोला गेली आहे. न्यूयॉर्कमधील इस्पितळात तिने मुलाला जन्म देण्याचं ठरवलं होतं, परंतु परिस्थीती आता हाताबाहेर गेली असून तिने शहराबाहेर जाण्याचा निर्णय गेतला आहे. न्यूयॉर्क टाइम्सशी झालेल्या संभाषणात ती म्हणाली की, 'न्यूयॉर्क सोडणं हा योग्य निर्णय आहे. विमान उडताच, मी रडण्यास सुरवात केली, माझे घर सोडताना मला वाईट वाटते.' या महिलेचे म्हणणे आहे की इथल्या इस्पितळात कोणतीही संरक्षक उपकरणे आणि व्हेंटिलेटर शिल्लक नाहीत. अगदी डॉक्टर आणि परिचारिकांनाही या विषाणूची लागण झाली आहे. हे वाचा - Lockdown मधे पोलिसांनी शहीदांच्या घरी पोहोचवली मदत, रडत आई म्हणाली... गेल्या आठवड्यातच, न्यूयॉर्कच्या दोन प्रमुख हॉस्पिटल, प्रेसबेटेरियन आणि माउंट सिनाई यांनी लेबर रूम आणि डिलिव्हरी रूममध्ये सहाय्यक वस्तूंवर बंदी घातली आहे, ज्यास बर्‍याच गर्भवती महिलांनीदेखील विरोध दर्शविला होता. सर्वात भयानक बाब म्हणजे संसर्ग होण्याच्या अर्ध्याहून अधिक घटना एकट्या न्यूयॉर्कमध्येच आहेत. राज्याचे राज्यपाल एंड्रू कुओमो म्हणाले की, इतर राज्यांतही ही परिस्थिती भयानक असू शकते. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, धोकादायक कोरोना विषाणूचा पूर्णपणे पराभव करण्यासाठी अमेरिकेने त्याच्याविरूद्ध युद्ध पुकारले आहे. ते म्हणाले की, देशात मास्क, हातमोजे यासारख्या वैद्यकीय सुरक्षा उपकरणांची कमतरता भासू नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अहवालानुसार, आरोग्य कर्मचारी सांगतात की त्यांना हाच मास्क वारंवार वापरायचा आणि आवश्यकतेनुसार स्कार्फ वापरण्यास सांगितले गेले. ताज्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 40 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जग या विषाणूंविरूद्ध लढत आहे. येथे भारतातही कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. हे वाचा - मुंबईमध्ये कोरोनाचा हाहाकार, 8 तासांत आढळले 62 नवे रुग्ण, 3 जणांचा मृत्यू
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या