SPECIAL REPORT : भारत चंद्रावर अन् इथं गर्भवती माऊलीला करावी लागली 35 किमी पायपीट!

SPECIAL REPORT : भारत चंद्रावर अन् इथं गर्भवती माऊलीला करावी लागली 35 किमी पायपीट!

प्रसुतीसाठी ही महिला चक्क 35 किलोमीटरचं अंतर पायी कापून सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर या महिलेनं पुन्हा गावागडे जाण्यासाठी परत 35 किमी प्रवास केला.

  • Share this:

महेश तिवारी, प्रतिनिधी

गडचिरोली, 26 सप्टेंबर : भारत चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे मात्र भारतातील ग्रामीण भागात असलेल्या महिलांना आरोग्याच्या सुविधा घेण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. 9 महिन्याच्या गर्भवती महिलेला तर चक्क 35 किलोमीटर पायपीट करून आरोग्यकेंद्र गाठावं लागत आहे.

हा प्रकार सरकारच्या आरोग्याच्या सुविधेचा पंचनामा करणारा आहेत. कारण, प्रसुतीसाठी 9 महिन्याच्या गर्भवती महिलेला चक्क 35 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला. होय, तुम्ही बरोबर ऐकले. 9 महिन्याच्या गर्भवतीचा 35 किलोमीटरचा पायी प्रवास...प्रसुतीसाठी मासे दुर्वा ही महिला चक्क 35 किलोमीटरचं अंतर पायी कापून सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर या महिलेनं पुन्हा गावागडे जाण्यासाठी 35 किलोमीटरचं अंतर कापलंय. मासे दुर्वा या गर्भवती महिलेची पायी पायपीट करणारी ही दृश्य पुरेशी बोलकी आहे. महिला पायीच जात नाहीये. तर तिच्या हातात 4 दिवसाचं बाळ आहे. येवढचं नाही तर तिच्या डोक्यावर सामानाचंही ओझ असल्याचं दिसत आहे.

छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील उसेवाटीतून ही महिला प्रसुतीसाठी गडचिरोलीतील लाहेरी आरोग्य केंद्रात आली. गावातून आरोग्य केंद्रात जाण्यासाठी रस्तेच नसल्यानं मासे दुर्गा या महिलेला प्रसुतीसाठी पायी ये-जा करावी लागली.

35 किलोमीटरचं अंतर पायी कापल्यानंतही मासे दुर्वा या महिलेचा अडचणीचा डोंगर इथेच संपत नाही. ताण्हबाळ घेऊन महिलेला बोटीचा आधार घ्यावा लागतोय. बोटीत बसून ही महिला नदी पार करून गावाला जावं लागातंय. दळणवळणाच्या सुविधाचं नसल्यानं महिलांचं आरोग्य धोक्यात आलंय. मात्र, त्याचं प्रशासनं आणि लोकप्रतिनिधींना कसलही सोयरसुतक नसल्याचं दिसतंय.

त्यामुळे आमच्या बातमीनंतर तरी झोपी गेलेले कुंभकर्णी प्रशासन जागं होईल आणि गावातील समस्या सुटेल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.

==================

First published: September 26, 2019, 8:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading