कोची, 4 सप्टेंबर : केरळमधील (Kerala) कोची (Kochi) जिल्ह्यातून एक धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. येथे एका बलात्कार पीडितेने वेळेपूर्वी जन्मलेल्या आपल्या बाळाला कमोडमध्ये फ्लश केलं. ज्यानंतर खळबळ उडाली. येथे एका तरुणीने खाजगी रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये बाळाला फ्लश (Rape Victim Flushes Premature Baby) केलं.
बलात्कारानंतर गर्भवती झाली अल्पवयीन मुलगी
मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षांच्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत कथित स्वरुपात बलात्कार केला होता. यानंतर ती गर्भवती झाली. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला केरळमधील वायनाड जिल्ह्यातून अटक केली आहे.
काय झालं होतं त्या दिवशी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व प्रकरणाचा खुलासा बुधवारी झाला. येथील अल्पवयीन बलात्कार पीडित मुलगी आईसोबत एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी आली होती. रुग्णालयात जेव्हा मुलगी टॉयलेटला गेली, तेथे तिने बाळाला जन्म दिला. यानंतर याबाबत तिने डॉक्टर आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याला सांगण्याऐवजी भृणाला कमोडमध्ये फ्लश केलं. तरुणी टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर जी व्यक्ती टॉयलेटला गेली तिला भृणाचे अवशेष टॉयलेटमध्ये दिसले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांची टीम रुग्णालयात पोहोचली. तेव्हा कळालं की तरुणीने नवजात बाळाला टॉयलेटमध्ये फ्लश केलं.
हे ही वाचा-पत्नी गरोदर राहिल्यानं कंडोम कंपनीकडे केली तक्रार; अधिकाऱ्यांनी ठेवली विचित्र अट
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत तरुणीने ही बाब मान्य केली. तिने सांगितलं की, आरोपीसोबत तिचे संबंध होते. मात्र यानंतर पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. ते पुढे म्हणाले की, अल्पवयीनने स्वत:चे संबंध आणि गर्भवती झाल्याबद्दल कोणाला काही सांगितलं नव्हतं. ती 6 महिन्यांच गर्भवती होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kerala, Rape