शिकागो, 18 मे : अमेरिकेतील शिकागो इथं धक्कादायक आणि मन सुन्न करणारी धक्कादायक घटना घडली आहे. गर्भवती तरूणीची हत्या करून तिच्या पोटातील मुल बाहेर काढणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 वर्षाच्या मार्लेना ओचाओ लोपेजला 23 एप्रिल रोजी मुलांच्या संगोपनासाठी लागणारे सामान दिलं जाणार असल्याचं सांगून एका घरात बोलावलं गेलं. त्यानंतर तिची हत्या करून पोटातील मुल बाहेर काढलं गेलं. याप्रकरणात 46 वर्षाच्या क्लारिसा फिग्युरोआ आणि 24 वर्षाची मुलगी डेसीरीवर याबाबतचे आरोप केले गेले आहेत. तर, क्लारिसा फिग्युरोआचा 40 वर्षाचा प्रेमी पिओट्र बोबाकवर हत्या करून त्याबाबत गुप्तता पाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.या घटनेनं मार्लेना ओचाओ लोपेजच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामध्ये नवा खुलासा देखील करण्यात येत आहे.
...म्हणून ऑक्सफर्ड डिक्शनरी म्हणते राहुल गांधी खोटं बोलत आहेत
काय आहे दावा
मार्लेना ओचाओ लोपेजला एका व्यक्तिनं पाहिलं होतं. त्यानंतर चार तासांनंतर फिग्युरोनं आपात्कालीन हेल्पलाईन नंबरवर फोन करत एका मुलाला जन्म दिल्याचा दावा केला. पण, त्या मुलाला श्वास घेण्यास अडचण येत असल्याचं कारण देत मुलाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी मुलाच्या तब्येतीबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान, फिग्युरो आणि मार्लेना ओचाओ लोपेजमध्ये 7 मे रोजी झालेल्या फेसबुकवरील संभाषणावरून सर्व गोष्टी हळूहळू स्पष्ट होत गेल्या.
पोलिसांनी मंगळवारी रात्री फिग्युरोच्या घराची झडती घेतली. त्यावेळी मार्लेना ओचाओ लोपेजचा मृतदेह सापडला. डीएनए तपासून पाहिल्यानंतर मुल मार्लेना ओचाओ लोपेजचं असल्याचं सिद्ध झालं. आता शिकागो पोलिस सध्या या सर्व प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
SPECIAL REPORT: तहान भागवण्यासाठी प्राण्यांची पाणवठ्याजवळ वर्दळ