हिंदू धर्माची व्याख्या सांगणारे मोहन भागवत कोण?, प्रवीण तोगडिया यांचा सवाल

हिंदू धर्माची व्याख्या सांगणारे मोहन भागवत कोण?, प्रवीण तोगडिया यांचा सवाल

भाजपाला राम मंदिराचा विसर पडला असून, मंदिर निर्मितीसाठी केंद्र सरकार कायदा का करीत नाही? असा सवाल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केलाय.

  • Share this:

नागपूर, 08 ऑक्टोबर : भाजपाला राम मंदिराचा विसर पडला असून, मंदिर निर्मितीसाठी केंद्र सरकार कायदा का करीत नाही? असा सवाल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केलाय.

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजपावर तोगडिया यांनी जोरदार टीका केली. तसेच हिंदू धर्माची व्याख्या सांगणारे भागवत कोण? असा सवाल करत तोगडियांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही लक्ष केलं.

दरम्यान, अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी  आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद  21 ऑक्टोबरपासून लखनौ ते अयोध्या अशी यात्रा काढणार असल्याचं नागपूरात  तोगडिया यांनी सांगीतलं.

सत्तेत आल्यावर अयोध्येत राम मंदिर बनवण्यात येणार असे आश्वासन भाजप गेल्या 32 वर्षांपासून देत आहे. मात्र सत्तेत आल्यावर भाजप हे आश्वासन विसरलं आहे. नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तोगडिया यांनी अयोध्येत राम मंदिर मुद्द्यावर भाजप, पंतप्रधान यांच्यावर जोरदार टीका केली.

इतर काही मुद्द्यावर सरकार संसदेत कायदा बनवू शकते तर मग मंदिरासाठी कायदा का नाही बनवत असा प्रश्न तोगडिया यांनी उपस्थित केला. सत्तेत आल्यावर मोदी मुस्लिम महिलांचे वकील बनले त्यामुळे तर 'अबकी बार हिंदुओ की सरकार' असा आमचा नारा राहणार असल्याचे तोगडिया यावेळी म्हणाले.

सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांना आठवण करून द्यावी लागत आहे की त्यांचा स्वयंसेवक हा प्रधानमंत्री आहे. राम मंदिर मुद्दयावर संसदेत कायदा बनवण्याची मागणी सोडून द्यावी म्हणून सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी भोपाळमध्ये माझ्यावर दबाव आणल्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तोगडिया यांनी केला.

उद्धव ठाकरे हे आयोध्येला जाणार आहेत यावर बोलताना तोगडिया यांनी आयोध्येत येणाऱ्यांची स्वागत असल्याचे सांगितलं. तर या भाषणावेळी त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांना निशाणा केला आणि त्यांच्यावर जोरदार टीका केली.

VIDEO: नागपूर रेल्वे स्थानकावर पेट्रोलच्या मालगाडीला आग, पण...!

First published: October 8, 2018, 9:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading