श्रीरामपूर तालुक्यात कालवा फुटल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली

श्रीरामपूर तालुक्यात कालवा फुटल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली

प्रवरा नदीचा डावा कालवा फुटल्याने श्रीरामपूर तालुक्यातली शेकडो एकर शेती पाण्याखाली गेलीय. नांदूर गावात हा कालवा फुटलाय. भंडारदरा धरणातून सध्या शेतीच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आलं होतं.

  • Share this:

07 डिसेंबर, शिर्डी : प्रवरा नदीचा डावा कालवा फुटल्याने श्रीरामपूर तालुक्यातली शेकडो एकर शेती पाण्याखाली गेलीय. नांदूर गावात हा कालवा फुटलाय. भंडारदरा धरणातून सध्या शेतीच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आलं होतं. कालवा फुटल्यानंतर आवर्तन तात्काळ बंद करण्यात आलंय. पण तरीही कालव्यातलं आटवणीचं पाणी अजूनही सुरूच आहे.

त्यामुळे या परिसरातली शेकडो एकर उसाची शेती पाण्याखाली गेलीय. तसंच या पाण्यामुळे भागात ऊसतोडीलाही मोठी अडचण होणार आहे. जलसंपदा विभागाने कालव्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केल्यानेच हा कालवा फुटल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 04:16 PM IST

ताज्या बातम्या