News18 Lokmat

विखेपाटलांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर प्रवरा लोणीतील ऊस उत्पादकांचे उपोषण मागे

सहकारमहर्षी विठ्ठलराव विखेपाटील यांच्या पुतळ्यासमोर ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू केलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना 2500 रुपयांचा भाव देण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतलं.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 8, 2017 07:19 PM IST

विखेपाटलांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर प्रवरा लोणीतील ऊस उत्पादकांचे उपोषण मागे

08 डिसेंबर, प्रवरा लोणी : सहकारमहर्षी विठ्ठलराव विखेपाटील यांच्या पुतळ्यासमोर ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू केलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना 2500 रुपयांचा भाव देण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतलं.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान 2500 रुपयांचा भाव द्यावा, तसंच कारखान्यांना होणारा तोटा भरून काढण्यासाठी केंद्रीय उच्चाधिकार समिती स्थापन्याचं आश्वासनही यावेळी देण्यात आलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आज उपोषण मागे घेतलं असलं तरी भविष्यात जे कारखाने ठरल्याप्रमाणे भाव देणार नाहीत, त्यांच्याविरोधात यापुढेही संघर्ष करत राहणारच, अशा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिलाय.

नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या गावातच उपोषण सुरू केल्यानं, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विखेंच्या विरोधकांनीही या आंदोलनाला हवा देण्याचा प्रयत्न केला होता, पण विखेपाटलांनी वेळीच आंदोलकांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावल्याने विखे समर्थकांचा जीव नक्कीच भांड्यात पडला असणार आहे. कारण नगर जिल्ह्यातील घोटणमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्याने सरकारविरोधात मोठा रोष निर्माण झाला होता. अशातच प्रवरा लोणीतलं हे आंदोलन आणखी चिघळलं असतं तरी सरकारसोबतच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांचीही चांगलीच कोंडी झाली असती, पण त्यांनी वेळीच यशस्वी मध्यस्थी केल्यानं तुर्तासतरी हा प्रश्न निकाली निघालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2017 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...