स्मिता पाटीलच्या मुलाचं ठरलं लग्न, लखनऊमध्ये या अभिनेत्रीशी करणार लग्न

यावेळी बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत अनेक व्यक्ती नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी येतील.

  • Share this:

रणवीर सिंग- दीपिका पदुकोण, कपिल शर्मा- गिन्नी आणि प्रियांका चोप्रा- निक जोनसनंतर आता दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरही लग्न बंधनात अडकणार आहे.

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक त्याची प्रेयसी सान्या सागर दोघंही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आता दोघंही लखनऊमध्ये लग्न करणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २२ जानेवारी म्हणजे आज दोघांचं लग्न आहे. दोन दिवस लग्न समारंभ सुरू राहील. असं म्हटलं जात आहे की या लग्नात अनेक सेलिब्रिटीही उपस्थित राहतील.

प्रतीक आणि सान्याने एक वर्षापूर्वी साखरपुडा केला होता. दोघं अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्टनुसार लग्नानंतर दोघंही मुंबईत मोठं रिसेप्शन ठेवणार आहेत. यावेळी बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत अनेक व्यक्ती नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी येतील. राज बब्बर सुरुवातीपासूनच उत्तर प्रदेशमधील राजकारणात सक्रीय आहेत. यामुळे ते जास्तकरून लखनऊमध्येच राहतात.

याच कारणामुळे प्रतीकचं लग्नही लखनऊमध्येच होत आहे. आपल्या लग्नाबद्दल बोलताना एका मुलाखतीत प्रतीक म्हणाला की, ‘सान्या आणि माझ्या कुटुंबाने हे पक्क केलं होतं की आमचं लग्न वसंत पंचमीला झालं पाहिजे. यामुळे आम्ही लग्न त्याच दिवशी करत आहोत.’

प्रतीक म्हणाला की, ‘या क्षणाला मी फार आनंदी आहे. मला जसा पार्टनर हवा होता सान्या अगदी तशीच आहे. ती माझ्यासाठीच बनली आहे हे जाणून घ्यायला मला जास्त वेळ लागला नाही.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 10:47 AM IST

ताज्या बातम्या