स्मिता पाटीलच्या मुलाने वडिलांसाठी हात जोडून मागितली मतं

रोड शोमध्ये भाजपने गेल्या पाच वर्षात या भागात कोणताही विकास केला नसल्याचा दावा राज बब्बर यांनी यावेळी केला.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 12:21 PM IST

स्मिता पाटीलच्या मुलाने वडिलांसाठी हात जोडून मागितली मतं

नुकताच ‘मुल्क’ सिनेमात दिसलेला अभिनेता प्रतीक बब्बरने उत्तर प्रदेशच्या फतेहपुर सिकरीमध्ये वडील राज बब्बर यांच्यासाठी कँपेन केलं. राज हे काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रचारादरम्यानचे फोटो शेअर केले. यात तो हात जोडून वडिलांसाठी मतं मागताना दिसत आहे.

प्रतीकने यावेळी जनतेशी चर्चा करत त्यांच्याकडे वडिलांसाठी मतंही मागितली. निवडणुकांच्याआधी राज यांनी फतेहपुर सिकरी येथे एक रोड शो केला. या रोड शोमध्ये भाजपने गेल्या पाच वर्षात या भागात कोणताही विकास केला नसल्याचा दावा राज बब्बर यांनी यावेळी केला.

राज म्हणाले की, ‘इथले लोक माझ्यावर प्रेम करतात आणि माझंही त्यांच्यावर अफाट प्रेम आहे. ही निवडणूक याच प्रेम आणि आदराची आहे. इथली लोक फार प्रेमळ आहेत. मी इथे कामही केलं आहे. ही माझी माणसं आहेत, त्यामुळे इथली लोक भाजपला मतं देतील आणि त्यांची सत्ता येईल असं काही होणार नाही.’

Loading...

प्रियांका गांधींबद्दल बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी पदावर त्या आल्यानंतर राज्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतो. राज यांनी फिरोजाबाद येथून निवडणूक लढवली होती.

प्रतीक यांच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो ‘दंगल’ फेम दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘छिछोरे’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर आणि वरुण शर्मा असणार आहेत. याशिवाय ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ सिनेमातही तो झळकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 12:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...