शिवसेनेचे आमदार झाले आता भाजपचे, चिखलीकरांनी दिला राजीनामा

शिवसेनेचे आमदार झाले आता भाजपचे, चिखलीकरांनी दिला राजीनामा

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची राज्यातील दुसरी यादी जाहीर झाली. या यादीत नांदेडमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चिखलीकर यांनी आता शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

  • Share this:

मुजीब शेख,प्रतिनिधी नांदेड 23 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची राज्यातील दुसरी यादी जाहीर झाली. या यादीत नांदेडमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चिखलीकर यांनी आता शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

शिवसेनेचे लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. सोमवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू होणार आहे. त्यामुळे आज प्रताप पाटील चिखलीकरांनी आपला राजीनामा दिली आहे. प्रताप पाटील सेनेचे आमदार असताना दोन वर्षांपासून भाजपात दाखल झाले होते.

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत चिखलीकरांनी पक्षाचा आदेश डावलून भाजपला मदत केली होती. तसंच मुंबईत झालेल्या भाजपच्या बैठकींमध्येही चिखलीकर कायम हजर राहत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही नांदेड पालिकेत कामगिरीनंतर चिखलीकरांचं जाहीर कौतुक केलं होतं.

अखेर भाजपकडून चिखलीकरांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. चिखलीकर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना आव्हान देणार आहे.

भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार

नागपूर - नितीन गडकरी

धुळे- सुभाष भामरे

वर्धा - रामदास तडस

नंदुरबार - हीना गावित

रावेर - रक्षा खडसे

अकोला - संजय धोत्रे

गडचिरोली - अशोक महादेवराव नेते

चंद्रपूर - हंसराज गंगाराम अहिर

जालना - रावसाहेब दानवे

भिवंडी - कपिल पाटील

मुंबई उत्तर - गोपाल शेट्टी

उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन

अहमदनगर - सुजय विखे पाटील

बीड - डाॅ. प्रीतम मुंडे

लातूर - सुधाकरराव भालेराव-शृंगारे

सांगली - संजयकाका पाटील

लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

============================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2019 08:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading