प्रशांत दामलेंची पॉझिटिव्हिटी जगात भारी! कोरोनाची लागण झाली तरी VIDEO मधून असा साधला संवाद

प्रशांत दामलेंची पॉझिटिव्हिटी जगात भारी! कोरोनाची लागण झाली तरी VIDEO मधून असा साधला संवाद

प्रशांत दामले फेसबुकवरुन काय म्हणाले पाहा...

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता व नाट्य निर्माते प्रशांत दामले (Prashant Damle Corona Possitive) यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना स्वत: फेसबुकच्या माध्यमातून याची माहिती दिली. कोरोना काळात सर्वच व्यवस्था बंद होत्या. त्यात सिनेमाबरोबरच नाटकांचे प्रयोगही बंद होते. गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा सुरू झाले आहेत.

यामध्ये एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोगही सुरू झाले असताना प्रशांत दामलेंना कोरोनाची लागण झाल्यामुळे रिओपनिंगचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. याशिवाय प्रशांत दामले यांना सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. लॉकडाउननंतर पहिल्यांदाच 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग 12 डिसेंबरला पुण्यात झाला होता. त्यानंतर त्यांना कणकण जाणवत होती. त्यांनी चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली.

त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्याच अनोख्या शैलीत सांगितले आहे. ते म्हणाले की, ड़ॉक्टरांनी मी कोरोनात काठावर असल्याचं सांगितलं. तर मी लहानपणापासून काठावरच पास झालो आहे...याबरोबरच कोरोनाची लागण झाली असली तरी मी ठणठणीत आहे आणि 'एका लग्नाची पुढची गोष्ट' टीमचे इतर सदस्यही एकदम व्यवस्थित असल्याचं सांगितलं.

Published by: Meenal Gangurde
First published: December 18, 2020, 10:53 PM IST

ताज्या बातम्या