मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /..तर काँग्रेस मंत्र्यांनी राजीनामा द्यावा! पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची आक्रमक भूमिका, Video व्हायरल

..तर काँग्रेस मंत्र्यांनी राजीनामा द्यावा! पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची आक्रमक भूमिका, Video व्हायरल

Praniti Shinde aggresive for Reservation in Promotion सोनिया गांधी यांनी अत्यंत संवेदनशील पत्र याबाबत राज्य सरकारला लिहिलं होतं. पण त्याकडंही दुर्लक्ष करत हा जीआर लागू करणं चुकीचं असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

Praniti Shinde aggresive for Reservation in Promotion सोनिया गांधी यांनी अत्यंत संवेदनशील पत्र याबाबत राज्य सरकारला लिहिलं होतं. पण त्याकडंही दुर्लक्ष करत हा जीआर लागू करणं चुकीचं असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

Praniti Shinde aggresive for Reservation in Promotion सोनिया गांधी यांनी अत्यंत संवेदनशील पत्र याबाबत राज्य सरकारला लिहिलं होतं. पण त्याकडंही दुर्लक्ष करत हा जीआर लागू करणं चुकीचं असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

सोलापूर, 28 मे : अनुसुचित जाती-जमातींच्या पदोन्नतीतील आरक्षण (SC ST Reservation in Promotion) रद्द करण्या बाबतच्या जीआरवरून काँग्रेस (Congress) आक्रमक झाली आहे. काँग्रेसनं या संदर्भात सर्व आमदार, अभ्यासक, समाजातील विविद क्षेत्रातील मंडळी या सर्वांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. जवळपास 500 जणांनी यात सहभाग घेतला होता. यामध्ये प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या व्हिडिओची क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्याच प्रणिची शिंदे यांनी यासाठी सरकारवर दबाव आणणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

(वाचा-सरकारचे मौन अधिकच गंभीर! जालन्यातील व्हिडिओबाबत फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र)

या संदर्भातला जी आर हा 7 मे रोजी आला आहे. त्यानंतर याबाबत भूमिका घ्यायला दिरंगाई झाल्याचं प्रणिति शिंदे यांनी म्हटलं आहे. मात्र तसं असलं तरी देर आये दुरुस्त आये म्हणजे याबाबत आता पुढे काय करायचं याचा निर्णय घेणं गरजेचं आहे. सर्वात आधी महाविकास आघाडी सरकारवर दबाव निर्माण करून हा जीआर मागं घ्यायला भाग पाडायला हवं असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. राजकीय दबावाच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याशिवाय सुप्रीम कोर्टात याच्या विरोधात याचिका दाखल करून त्यावर स्टे आणणं गरजेचं असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय.

(वाचा-1 जूननंतरही अनलॉक नाही, कॅबिनेटच्या बैठकीत सरकारी-शासकीय कार्यालयांबाबत काय ठरलं)

काँग्रेसला विश्वासात न घेता सरकारनं हा जी आर लागू केला असून ते अत्यंत चुकीचं आहे. त्याबाबत नाना पटोलेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचं प्रणिती शिंदेंनी कौतुक केलं. सरकार जर हा जी आर मागं घेत नसेल तर काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे द्यायला हवे असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या. सोनिया गांधी यांनी अत्यंत संवेदनशील पत्र याबाबत राज्य सरकारला लिहिलं होतं. पण त्याकडंही दुर्लक्ष करत हा जीआर लागू करणं चुकीचं असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

अनुसुचित जाती जमातींच्या विविध योजना किंवा इतर उपक्रमांसाठीचा खूप निधी पडून आहे. हा निधी खर्च करून गरीब वर्गासाठी काम करणं गरजेचं असल्याचा मुद्दाही यावेळी प्रणिती शिंदे यांनी मांडला. एकूणच अनुसुचित जाती-जमातींच्या पदोन्नतीतील आरक्षणावर राज्य सरकारनं काढलेल्या जीआरवरून काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा सरकारवर परिणाम होणार का याचीच सध्या सगळीकडं चर्चा सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Congress, Maharashtra News, Solapur