S M L

प्रकाश मेहतांची लोकायुक्तांमार्फेत चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

एफएसआय घोटाळ्यामुळे वादात अडकलेल्या गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या आरोपांची लोकायुक्तांमार्फेत चौकशी होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

Sachin Salve | Updated On: Aug 11, 2017 09:53 PM IST

प्रकाश मेहतांची लोकायुक्तांमार्फेत चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

11 आॅगस्ट : एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळ्यामुळे वादात अडकलेल्या  गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या आरोपांची  लोकायुक्तांमार्फेत चौकशी होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. तसंच सुभाष देसाईंचीही स्वतंत्र यंत्रणेमार्फेत चौकशी केली जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. राधेश्याम मोपलवारांची आर्थिक गुन्हे शाखे मार्फत चौकशी करणार असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली. आज विधानसभेचं सूप वाजलं. मुख्यमंत्र्यांनी निवेदन देताना प्रकाश मेहता यांच्यावरील आरोप गंभीर आहे त्यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी होईल असं जाहीर केलं. लोकायुक्त हे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीशच आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

समृद्धी हायवे जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी  एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार यांना पदावरून हटवण्यात आलंय. मोपलवारांची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी केली जाणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.एसआरए प्रकल्पात घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांचीही चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. संदीप येवले यांची EOW मार्फत चौकशी चौकशी सुरू केलीये. एसिबीमार्फतही ही चौकशी केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

सुभाष देसाईंवरचे आरोप हे गंभीर आहेत. प्रकाश मेहतांसारखीच त्यांचीही चौकशी लोकायुक्तांकडे लावावी अशी मागणी सुनील तटकरे यांनी केली.

तर प्रकाश मेहतांची लोकआयुक्तांकडे चौकशी आणि सुभाष देसाईंची फक्त चौकाशी का? असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला.

Loading...
Loading...

 

काय आहे मेहतांचा एसआरए घोटाळा ?

मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पा जादा एफएसआय मंजूर करून घेताना प्रकाश मेहतांनी त्या फाईलवर मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आले आहे, असा शेरा मारला होता. हे जादा एफएसआय घोटाळ्याचं प्रकरण उघडकीस येताच मुख्यमंत्र्यांनी हा वादग्रस्त एसआरए प्रस्तावच रद्द करून टाकलाय. पण तरीही विरोधक मेहतांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. नियम 293 अन्वये या प्रस्तावावार विधानसभेत चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 09:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close