• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • मी मंत्रिपद सोडायला तयार, मात्र, निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा !- प्रकाश मेहता

मी मंत्रिपद सोडायला तयार, मात्र, निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा !- प्रकाश मेहता

एसआरए घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी अखेर पद सोडायची तयारी दाखवलीय

  • Share this:
मुंबई, 4 ऑगस्ट : एसआरए घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी अखेर पद सोडायची तयारी दाखवलीय, मुख्यमंत्री म्हटले तर मी पद सोडायला तयार आहे, चौकशी पूर्ण होईपर्यंत पदापासून दूर होईन. असंही प्रकाश मेहता यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं. पण मेहतांच्या या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर राजीनामा देईन, असा आवर्जून उल्लेख करत राजीनाम्याच्या निर्णयाचा चेंडू सोईस्करपणे मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवलाय. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्षं लागलंय. गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांनी प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यावरून सभागृहाचं कामकाज रोखून धरलंय. प्रकाश मेहतांनी स्वतःहून मंत्रीपदाचा स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी तरी त्यांना मंत्रीमंडळातून हटवलं पाहिजे, अशी ठाम भूमिका अजित पवारांनी आज सभागृहात मांडली. त्यानंतर प्रकाश मेहतांनी स्वतःहून राजीनाम्याची तयारी दाखलवीय. सूत्रांच्या माहितीनुसार माध्यमं आणि विरोधकांचा दबाव वाढल्यानंतर पक्षनेतृत्वाकडूनच प्रकाश मेहता यांना पद सोडण्यासंबंधीचे स्पष्ट संकेत दिले गेल्याचं कळतंय. त्यानंतर आज लगेचच प्रकाश मेहतांनी स्वतःहून मंत्रिपद सोडण्याची तयाची दर्शवलीय. आयबीएन लोकमतनेही प्रकाश मेहतांच्या घोटाळ्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले होते. काय आहे मेहतांचा एसआरए घोटाळा ? मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पा जादा एफएसआय मंजूर करून घेताना प्रकाश मेहतांनी त्या फाईलवर मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आले आहे, असा शेरा मारला होता. हे जादा एफएसआय घोटाळ्याचं प्रकरण उघडकीस येताच मुख्यमंत्र्यांनी हा वादग्रस्त एसआरए प्रस्तावच रद्द करून टाकलाय. पण तरीही विरोधक मेहतांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. नियम 293 अन्वये या प्रस्तावावार विधानसभेत चर्चा सुरू आहे.
First published: