मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पंकजा मुंडेंच्या मामांसह शिवसेनेच्या माजी आमदाराचा मनसेत प्रवेश

पंकजा मुंडेंच्या मामांसह शिवसेनेच्या माजी आमदाराचा मनसेत प्रवेश

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन आणि कन्नडचे शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा मनसेची वाट धरली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन आणि कन्नडचे शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा मनसेची वाट धरली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन आणि कन्नडचे शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा मनसेची वाट धरली आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई,8 फेब्रुवारी: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन आणि कन्नडचे शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा मनसेची वाट धरली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'कृष्णकुंज'वर प्रकाश महाजन आणि हर्षवर्धन जाधव यांनी अधिकृत प्रवेश केला आहे. याचबरोबर शिवसेनेचे गटनेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू सुहास दशरथे यांनी आणि शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही मनसेत प्रवेश केला आहे. प्रकाश महाजन हे. भाजपचे दिवंगत दिग्गज नेते प्रमोद महाजन यांचे बंधू आहेत. दरम्यान, मनसेचा उद्या (रविवार) होणारा मोर्चा आझाद मैदान येथे काढण्यात येणार आहे. मोर्चासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या पारसी जिमखाना येथे लावून त्यांनी पायी आझाद मैदानला यावे, अशी सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. 'मनसे'च्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली, फक्त सभा घेण्याची अट 'मनसे'ने घुसखोरांविरोधात उद्या मोर्चा काढणार आहे. मुंबई पोलिसांनी त्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. फक्त आझाद मैदानात सभा घ्या असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार दक्षिण मुंबईत मोर्चे काढण्यास मनाई आहे. संवेदनशील आणि गजबजलेला भाग तसेच अनेक परदेशी दुतावास असल्याने दक्षिण मुंबईत मोर्चाकरता मनाई आहे. असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी मनसेच्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. मात्र मोर्चाच्या काही तास आधी मुंबई पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. 'चौक सभांमधून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास कारवाई करण्यात येईल,' अशा नोटीसा पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना पाठवण्यात आल्या आहेत. कलम 143,144 आणि 149 नुसार प्रतिबंधात्मक कारवाईनुसार या नोटीसा पाठवल्या आहेत. पोलिसांच्या या भूमिकेनंतर मनसे नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. 'रात्रभर चालणाऱ्या आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडत नाही, मात्र आम्ही एक मोर्चा काढल्याने लगेच कसा प्रश्न तयार होतो?' असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यामुळे मनसेच्या या महामोर्चाआधी वातावरण चांगलंच ढवळून निघत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे 9 फेब्रुवारीला काही कार्यकर्त्यांची धरपकडही होण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Latest news

पुढील बातम्या