News18 Lokmat

तुम्ही बारामती जिंकूनच दाखवा, प्रकाश आंबेडकरांचं पवारांना आव्हान

मी सत्तेत आल्यानंतर RSS वर बंदी घालणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2019 10:31 PM IST

तुम्ही बारामती जिंकूनच दाखवा, प्रकाश आंबेडकरांचं पवारांना आव्हान

सागर सुरवसे, प्रतिनिधी

सोलापूर, 10 एप्रिल : 'मी पळपुट्यांना विचारतोय की तुम्ही का पळालात? असा पळपुटेपणा आमच्यात नाही. दोन हात करण्याची संधी आम्ही घालवत नाही' अशा शब्दात भारिपचे अध्यक्ष आणि लोकसभेत सोलापूर मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

सोलापूरमध्ये आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. 'सोलापूर आणि आकोल्यातून लढतोय म्हणून विरोधकांच्या पोटात दुखत आहे. पण मी हारलो तरी जिवंत राहतो' असं आंबेडकर म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी पवारांना ओपन चॅलेंज दिलं. 'शरद पवार तुम्ही बारामती जिंकूनच दाखवा. मी तुम्हाला आव्हान देतोय. जेवढा पैसा खर्च करायचाय तो करा.' असं आंबेडकर म्हणाले.

काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांचं चॅलेंज

यावेळी बोलतना आंबेडकरांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसवाल्यांना चॅलेंज देतो की, सोलापूर आणि आकोला दोन्ही मी जिंकतो.' आंबेडकरांच्या या भाषणामुळे सभेत एकच जल्लोष उठला होता.

Loading...

हेही वाचा: प्रकाश आंबेडकरांना मोठा झटका, वंचित बहुजन आघाडीत फूट!

'कमरेखालचं राजकारण आम्ही करत नाही. तुम्ही कमरेखालचं राजकारण करणार असाल तर याद राखा. लिमिट क्रॉस करू नका नाहीतर आम्ही लिमिट क्रॉस करू.' अशा कठोर शब्दात यावेळी आंबेडकरांनी विरोधकांना इशारा दिला.

या सभेतील भाषणात त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही टीका केली. 'सुशीलकुमार शिंदे तुम्ही मुख्यमंत्री असताना पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील मागासवर्गीय हॉस्टेलची जागा मॉलला विकली की नाही ते सांगा.' असा थेट सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.

सत्तेत आल्यावर RSS वर बंदी घालणार

'शिंदे गृहमंत्री असताना RSS कडे AK-47 कुठून आल्या, त्यांना टॉमी गन कुठून मिळाली हे सांगाव. 2019च्या निवडणुकीत RSS आणि ISI यांची युती आहे. म्हणून इमरान खान बोलतोय. त्यामुळे मी सत्तेत आल्यानंतर RSS वर बंदी घालणार' असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

जाहीर सभेत प्रकाश आंबेडकरांना ओवेसींनी उचलून घेतलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 10:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...