काँग्रेसने 2019 ची नाहीतर 2024ची तयारी करावी- प्रकाश आंबेडकर

काँग्रेसने 2019 ची नाहीतर 2024ची तयारी करावी- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांपाठोपाठ काँग्रेसवरही शरसंधान साधलंय. देशाच्या राजकारणात विरोधकांमध्ये काँग्रेसपेक्षा तिसऱ्या आघाडीला अधिक स्पेस असल्याचा दावा करत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 2019 नाहीतर 2024ची तयारी करण्याचा अनाहुत सल्ला दिलाय.

  • Share this:

5 फेब्रुवारी, मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांपाठोपाठ काँग्रेसवरही शरसंधान साधलंय. देशाच्या राजकारणात विरोधकांमध्ये काँग्रेसपेक्षा तिसऱ्या आघाडीला अधिक स्पेस असल्याचा दावा करत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 2019 नाहीतर 2024ची तयारी करण्याचा अनाहुत सल्ला दिलाय. त्यामुळे देशात आणि राज्यात भाजप सरकारविरोधात विरोधकांची एकत्रित मोट बांधू पाहणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीला प्रकाश आंबेडकरांनीच अपशकून केलाय.

2019साली कोणासोबत जायचं याचा निर्णय कर्नाटक इलेक्शननंतरच घेणार असल्याचं सांगत प्रकाश आंबेडकरांनी आपला कल हा काँग्रेससोबत नाहीतर डाव्या आघाडीसोबत जाण्याच्या बाजूने असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनीच पाठिशी घातल्याचा गंभीर आरोप काल प्रकाश आंबेडकरांनी केल्याने राज्याच्या राजकारणात विरोधकांमध्ये एैक्य निर्माण होण्याआधीच फूट पडल्याचं चित्र निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवरच न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी प्रकाश आंबेडकरांची बेधडक मुलाखत घेतली. त्यात त्यांनी राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणातील सद्यस्थितीवर परखड भाष्य केलं.

भाजप आणि आरएसएस हे आपले प्रमुख विरोधक असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेही आपले अजिबात मित्र नाहीत, हे सांगायलाही आंबेडकर विसरले नाहीत. आंबेडकरांच्या या ताठर भूमिकेमुळे भाजपशी दोन हात करण्यासाठी निघालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या शिडालाच भोकं पडल्याची चिन्हं दिसताहेत.

प्रकाश आंबेडकरांची संपूर्ण मुलाखत इथे पाहा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2018 06:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading