महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद -प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद -प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्त पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद अखेर दुपारी साडेचार नंतर मागे घेण्यात आलाय. प्रकाश आंबेडकर यांनीच आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची घोषणा केली. आजच्या महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून त्यात महाराष्ट्रातली 50 टक्के जनता सहभागी झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय.

  • Share this:

03 जानेवारी, मुंबई : भीमा कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्त पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद अखेर दुपारी साडेचार नंतर मागे घेण्यात आलाय. प्रकाश आंबेडकर यांनीच आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची घोषणा केली. आजच्या महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून त्यात महाराष्ट्रातली 50 टक्के जनता सहभागी झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये फक्त दलित बांधव नाहीतर इतर समाजाचेही लोक सहभागी झाल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय. या बंदमध्ये भारीप बहुजन महासंघ, डावी लोकशाही आघाडी आणि इतर समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. किरकोळ प्रकार वगळता आजचा महाराष्ट्र बंद अतिशय शांततेत पार पडल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय.

''जो न्याय याकूब मेमनला, तोच भिडे, एकबोटेंना लावा' तसंच 'भीमा-कोरेगावच्या आरोपींवर 302 दाखल करावा, अशी मागणीही आंबेडकरांनी यावेळी केली. सरकार या घटनेची न्यायालयीन चौकशी करणार असल्यानं आम्ही समाधानी आहोत. पण यातून सत्य बाहेर यावं, अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2018 04:46 PM IST

ताज्या बातम्या