Home /News /news /

सरकार संभाजी भिडेंना अटक कधी करणार ?- प्रकाश आंबेडकर

सरकार संभाजी भिडेंना अटक कधी करणार ?- प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी सरकार संभाजी भिडे यांना सरकार कधी अटक करणार, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. तसंच कालच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना पकडण्यासाठी सुरू केलेलं कोम्बिंग ऑपरेशन थांबवण्याची विनंतीही प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.

पुढे वाचा ...
04 जानेवारी, मुंबई : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी सरकार संभाजी भिडे यांना सरकार कधी अटक करणार, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. तसंच कालच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना पकडण्यासाठी सुरू केलेलं कोम्बिंग ऑपरेशन थांबवण्याची विनंतीही प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. कालच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोरेगाव भीमा प्रकरणी नियुक्त करण्यात येणाऱ्या न्यायालयीन चौकशी समितीला गुन्हे दाखल करण्याचे अधिकार दिले जावेत, अशी मागणीही प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली. तसंच कालचं आंदोलन हे फक्त दलितांचं नव्हतं तर त्यात ओबीसीमधले इतर समाज घटकही सहभागी झाले होते. आपले इतर समाजाच्या संघटनांशीही चांगले संबंध असल्यामुळेच राज्यातला सामाजिक असंतोष बऱ्यापैकी निवळल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. तसंच कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्री दोषींवर कारवाई करतील, अशी आशाही प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.
First published:

Tags: Koregona bhima, Prakash ambedkar meets cm, कोरेगाव भीमा, संभाजी भिडे

पुढील बातम्या