मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

प्रेषित मोहम्मदांच्या सिनेमा बंदीवर प्रकाश आंबेडकर मुख्यंत्र्यांना भेटले, मोदींशी होणार चर्चा

प्रेषित मोहम्मदांच्या सिनेमा बंदीवर प्रकाश आंबेडकर मुख्यंत्र्यांना भेटले, मोदींशी होणार चर्चा

बकरी ईद आणि लॉकडाऊन दरम्यान वातावरण बिघडू नये यावरही महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

बकरी ईद आणि लॉकडाऊन दरम्यान वातावरण बिघडू नये यावरही महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

बकरी ईद आणि लॉकडाऊन दरम्यान वातावरण बिघडू नये यावरही महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

    मुंबई, 17 जुलै : राज्यात कोरोनाच्या वाढत्या आकड्यांमुळे चिंतेचं वातावरण असतानाच राजकीय घडामोडींमुळे वातावरण तापलं आहे. वंचीत बहूजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी कोरोना आणि काही महत्त्वाच्या विषयांवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘मुहम्मद: द मैसेंजर ऑफ गॉड’ (Muhammad The Messenger of God) हा वादग्रस्त सिनेमा राज्यात बॅन केल्यानंतर आता देशातही बॅन व्हावा यासाठी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार आहेत. बकरी ईद आणि लॉकडाऊन दरम्यान वातावरण बिघडू नये यावरही महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयात केला बदल, राजकीय वर्तुळात खळबळ खरंतर, मुहम्मद: द मैसेंजर ऑफ गॉड’ (Muhammad The Messenger of God) हा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. माजिद माजिदी दिग्दर्शित हा चित्रपट प्रेषित मोहम्मद यांच्या जीवनावर आधारित आहे. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मोठा वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी पत्र लिहिलं आहे. 21 जुलै रोजी 'मुहम्मद: द मॅसेंजर ऑफ गॉड' डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पण या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी प्रतिक्रिया समोर येत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या बातम्या समोर आल्यापासून समाजात खळबळ उडाली आहे. या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी शेकडो कॉल येत आहेत असं पत्र रझा अॅकॅडमीने सरकारला लिहलं आहे. त्यामुळे या सिनेमावर बंदी घालावी अशी मागणी वारंवार समोर येत आहे. महाराष्ट्रात या जिल्ह्यात पुन्हा वाढणार लॉकडाऊन, महत्त्वाची बैठक सुरू 'मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी' दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत नुकतीच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक संपन्न झाली होती. त्या बैठकीत कोरोना पार्श्वभूमीवर या वर्षी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी, असे सर्वानुमते ठरले. त्या अनुषंगाने शासनाने काही मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचे पालन सर्व संबंधितांनी करावे असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये, नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी, कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Prakash ambdkar, Uddhav thackeray

    पुढील बातम्या