मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /सांगलीत सस्पेंस संपला, प्रकाश आंबेडकरांनी केला उमेदवार कन्फर्म

सांगलीत सस्पेंस संपला, प्रकाश आंबेडकरांनी केला उमेदवार कन्फर्म

प्रकाश शेंडगे यांच्या नावाची चर्चा ही केवळ अफवा असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

प्रकाश शेंडगे यांच्या नावाची चर्चा ही केवळ अफवा असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

प्रकाश शेंडगे यांच्या नावाची चर्चा ही केवळ अफवा असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

    सोलापूर, 30 मार्च : सांगलीतील उमेदवार बदलणार नाहीत. प्रकाश शेंडगे हेच आमचे उमेदवार असतील अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. प्रकाश शेंडगे यांच्या नावाची चर्चा ही केवळ अफवा असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

    नंदुरबारमधील भिल्ल समाजाचा उमेदवार बदलण्यात आला. काँग्रेस-भाजपने आमच्या उमेदवाराच्या घरात भांडणं लावल्याने उमेदवार बदलावा लागत असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. पण नवीन उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याची माहितीही प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

    सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकरांना दिलासा, या उमेदवाराने अर्ज मागे घेत दिला पाठिंबा

    वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. प्रकाश आंबेडकरांना या मतदारसंघात दिलासा मिळाला कारण बसपचे उमेदवार राहुल सरवदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला.

    सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर सुशीलकुमार शिंदे आणि भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामी यांचं आव्हान आहे. सोलापूरमध्ये दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे. अशातच बसपचाही उमेदवार रिंगणात उतरल्याने त्याचा फटका प्रकाश आंबेडकर यांना बसला असता.

    प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बसपच्या उमेदवाराने लढू नये, अशी दलित संघटनांची मागणी होती. बसपने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यावा, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर बसपच्या राहुल सरवदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

    अखेर प्रकाश आंबेडकरांना मिळालं 'हे' निवडणूक चिन्ह

    वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना अखेर निवडणूक चिन्ह मिळालं. आंबेडकर हे सोलापूरमधून आघाडीचे उमेदवार आहेत. आयोगाने त्यांना 'कप बशी' हे चिन्ह दिलं आहे. निवडणूक लढताना निवडणूक चिन्हाचं मोठं महत्त्व असतं. सोलापूरप्रमाणेच आंबेडकर हे विदर्भातल्या अकोल्यातूनही निवडणूक लढवत आहेत.

    आंबेडकर आणि असादुद्दीन ओवेसी यांनी मिळून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली होती. त्यांना त्यांचं स्वतंत्र निवडणुक चिन्ह नाही. त्यांना आयोगाकडे अर्ज करून चिन्ह घ्यावी लागतात. त्यात आंबेडकरांना 'कप बशी' हे चिन्ह मिळाल्याने आता ते त्याचा प्रचार करणार आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात कप बशी चिन्हाची मोठी क्रेझ असल्याचं अनेकदा आढळून आलं आहे.

    VIDEO: 'आपला पंतप्रधान कोण?' उद्धव ठाकरे म्हणाले...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Prakash ambedkar, Sangli S13p44