सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांनी दिलं स्पष्टीकरण

सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीमागे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी असताना झालेल्या या भेटीचा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 07:06 PM IST

सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांनी दिलं स्पष्टीकरण

सोलापूर, 13 एप्रिल : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांणा उधाण आलं होतं. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी खुलासा केला आहे. 'माझी आणि सुशीलकुमार शिंदेची सहज भेट झाली. त्यावेळी कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही.' असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीमागे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी असताना झालेल्या या भेटीचा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पण त्यावर आम्ही सहज भेटलो असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शिवराज पाटील चाकुरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे प्रकाश आंबेडकर यांना भेटले, असं स्पष्टीकरण काँग्रेसने दिलं. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर झालेल्या या भेटीने शहरात राजकीय चर्चा रंगत आहेत.

दरम्यान, यावेळी बोलताना देशात प्रथमच राजकीय स्वार्थासाठी सैन्याचा उपयोग होत असल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली. '‌इम्रान खानचं आणि मोदींचं कधीही पटलं नाही आणि पटेल असं वाटत नाही. जर का इम्रान खानला शांततेसाठी मोदींची आवश्यक वाटत असतील तर RSS आणि ISl चे काही संबंध आहे का हे मोहन भागवतांनी सांगावं.' असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सोलापुरात हाय-होल्टेज सामना

Loading...

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला. पण मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे हे जाएंट किलर ठरले. त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

सोलापुरातील यंदाची निवडणूक तिरंगी होणार आहे. कारण काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी मैदानात आहेत.

हेही वाचा: मनसेच्या सभांच्या खर्चाचं 'राज' काय? भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश?

मोहोळ

सोलापूर शहर उत्तर

सोलापूर शहर मध्य

अक्कलकोट

सोलापूर दक्षिण

पंढरपूर

या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं. पण मागील निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी करत सहापैकी दोन मतदारसंघात विजय मिळवला. लोकसभेत मिळालेल्या यशाच्या तुलनेत हे यश कमी असलं तरीही ते दुर्लक्षित करण्यासारखं नाही.


VIDEO :...म्हणून पार्थला दिल्लीत पाठवा, अजित पवारांचा तरुणांना मिश्किल सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 07:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...