'वंचित'ची एवढ्या जागांसाठी पहिली यादी जाहीर, उमेदवारांची जाहीर केली जात!

'वंचित'ची एवढ्या जागांसाठी पहिली यादी जाहीर, उमेदवारांची जाहीर केली जात!

वेगवेगळ्या समूहाला आम्ही प्रतिनिधींत्व दिलेलं आहे आणि हे लोकांसमोर आलं पाहिजे म्हणून आम्ही जात उमेद्वारांसमोर जात लिहिली आहे. जात कागदावर लिहिणं गरजेचं आहे.

  • Share this:

स्वाती लोखंडे-ढोके, मुंबई 24 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. सगळ्यांना वंचितच्या यादीची प्रतिक्षा होती. MIMशी काडीमोड घेतल्यानंतर आम आदमी पक्षाने वंचित सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जागा वाटपावरून न पटल्याने 'आप'नेही वंचितशी जास्त चर्चा न करता उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे 'वंचित' आता स्वबळावर सगळ्या जागा लढण्याची शक्यता आहे. लोकसभेत वंचितने उमेदवार देताना त्यांच्या जीतीही दिल्या होत्या. त्यामुळे वादही निर्माण झाला होता. आता विधानसभा निवडणुकीतही वंचितने उमेदवारांची जात जाहीर केलीय. सर्व जातींना सामावून घेण्यासाठीच जात जाहीर केल्याचा दावा वंचितने केला होता.

लोकसभेत तोंडावर आपटलात, आता झाकली मुठ ठेवा; तावडेंचा अशोक चव्हाणांना सल्ला

हे आहेत वंचितचे 22 उमेदवार

सुरेश जाधव, शिराळा

डॉ आनंद गुरव, करवीर

दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर

बाळकृष्ण शंकर देसाई, द. कराड

डॉ बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव

दीपक शामदिरे, कोथरूड

अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर

मिलिंद काची, कासबपेठ

शहानवला जब्बारशेख, भोसरी

शाकिर इसालाल तांबोळी, इस्लामपूर

इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याने नवा संभ्रम

किसन चव्हाण, पाथर्डी शेवगाव

अरुण जाधव, कर्जत जामखेड

सुधीर शंकरराव पोतदार, औसा

चंद्रलाल मेश्राम, ब्रह्मपुरी

अरविंद सांडेकर, चिमूर

माधव कोहळे, राळेगाव

शेख शफी अब्दुल नबी शेख, जळगाव

लालूस नागोटी, अहेरी

मणियार राजासाब, लातूर शहर

नंदकिशोर कुयटे, मोर्शी

ऍड आमोद बावने, वरोरा

अशोक गायकवाड, कोपरगाव

राष्ट्रवादीतून उदयनराजेंविरोधात कोण? पोटनिवडणुकीच्या घोषणेनंतर हालचालींना वेग

प्रकाश आंबेडकर म्हणाले, वेगवेगळ्या समूहाला आम्ही प्रतिनिधींत्व दिलेलं आहे आणि हे लोकांसमोर आलं पाहिजे म्हणून आम्ही जात उमेद्वारांसमोर जात लिहिली आहे. जात कागदावर लिहिणं गरजेचं आहे.  इतर पक्षांना स्वतःबद्दल असणारे अवास्तव समज  आणि समोरच्या ताटातील मुख्य खाद्यपदार्थ पळवण्याची वृत्ती यामुळे कुणाबरोबर आघाडी होत नाहीये. ज्याचं अस्तित्व नाही असे आम्हाला राजकारण शिकवायला लागले तर आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि  तुमचं राजकारण तुम्हीच करा असं सांगतो.

विधानसभेच्या एण्ट्री आधीच राज ठाकरे भाजपच्या टार्गेटवर, 'कोहिनूर मिल'वर टीका

एमआयएम ने स्वतःचा रस्ता स्वतः निवडला, पण आम्ही आजही बोलायला तयार आहोत. त्यांचा प्रतिसाद आम्हाला हवा तसा नाही, ते माध्यमातून बोलत आहेत, प्रत्यक्षात ते का बोलत नाहीत. आप ने चर्चा  होण्याआधीच त्यांनी आपली यादी जाहीर केली, त्यांना आम्ही जागाही वाढवून दिल्या. आम्ही सगळ्या जागांवर निवडणूक लढवणार. या यादीत 4 मुस्लिम उमेदवार आहेत .मोठ्या प्रमाणावर मुस्लिम उमेदवार येतोय आणि आमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे च्यामुळे मतांच विभाजन होणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 05:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading