Home /News /news /

बांधकामापूर्वीच सिमेंटच्या रस्त्याचं झालं 'कल्याण' !

बांधकामापूर्वीच सिमेंटच्या रस्त्याचं झालं 'कल्याण' !

पहिल्या टप्यामध्ये डोंबिवलीतील मानपाडा रोड, राजाजी पथ, फडके रोड आणि कल्याण रोड येथील कामं पूर्ण केली पण या सर्व रस्त्यांना महिन्याभरातच तडे गेल्याचं दिसून आलंय

 प्रदीप भणगे, कल्याण 20 जून : केडीएमसीमध्ये राज्यशासनाच्या सुवर्ण जयंती नागरोथान अभियानाअंतर्गत ३७४ कोटी रुपये खर्च करून सिमेंटचे रस्ते बनवण्याचे गेल्या 2 वर्षांपासून काम चालू आहे. पण हेच सिमेंटचे रस्ते निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे. पहिल्या टप्यामध्ये डोंबिवलीतील मानपाडा रोड, राजाजी पथ, फडके रोड आणि कल्याण रोड येथील कामं पूर्ण केली पण या सर्व रस्त्यांना महिन्याभरातच तडे गेल्याचं दिसून आलंय. तर कल्याण पश्चिममधील संतोषी माता मंदिर रोडचं काम चालू असतानाच काही ठिकाणी छोटे छोटे खड्डे पडले आहे. कल्याण पश्चिममधील संतोषी माता मंदिर सिमेंट रोडचं काम आद्यप पूर्ण झालं नसतानाच छोटे छोटे खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी रस्त्याचा सरफेस सुद्धा निघालेला दिसतोय. डोंबिवलीमधील कल्याण रोड आणि फडके रोडवर सुद्धा काही ठिकाणी सरफेस निघाल्याचे दिसून आलंय. या रोडबाबत मनसेनं स्ट्रचर ऑडिट करण्याची मागणी केली असून सत्ताधारी यांचं साटंलोटं आहे असा आरोप केलाय. संतोषी माता मंदिर रोडचे काम लँडमार्क काॅपोरेशन प्रा.ली. ह्या कंपनीला दिले असून ह्या रस्त्यासाठी पालिकेने तब्बल 43.11 कोटी रुपये मंजूर केले आहे. एवढा खर्च करून सुद्धा रस्ते चांगले गेले नाहीत आणि अर्धा रस्ता पेव्हर ब्लॉकने केला आहे असं स्थानिक रहिवाशी यांचं मत आहे. पारदर्शक काम करणारे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी शिवसेना आतातरी यामध्ये लक्ष घालणार का हे पाहावे लागेल. सरफेस उडालेले सिमेंटचे रस्ते --- संतोषी माता मंदिर रोड ,फडके रोड आणि कल्याण रोड. तडे गेलेलं सिमेंटचे रस्ते ---  मानपाडा रोड, राजाजी पथ , फडके रोड, लिंक रोड , कल्याण रोड आणि पेंडसेनगर मधील अंतर्गत रस्ता.
First published:

Tags: Kalyan, कल्याण, डोंबिवली

पुढील बातम्या