टपाल वाटप करून घरी आलेल्या पोस्टमनचा उष्माघाताने मृत्यू, बीडमधील घटना

टपाल वाटप करून घरी आलेल्या 38 वर्षीय पोस्टमनचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची बीड जिल्ह्यातील बनसारोळा येथे घटना घडली आहे. विक्रम भीमराव गायकवाड असे मृत पोस्टमनचे नाव आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2019 02:39 PM IST

टपाल वाटप करून घरी आलेल्या पोस्टमनचा उष्माघाताने मृत्यू, बीडमधील घटना

सुरेश जाधव (प्रतिनिधी),

बीड, 28 एप्रिल- टपाल वाटप करून घरी आलेल्या 38 वर्षीय पोस्टमनचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची बीड जिल्ह्यातील बनसारोळा येथे घटना घडली आहे. विक्रम भीमराव गायकवाड असे मृत पोस्टमनचे नाव आहे. अनुकंप तत्वावर ते पोस्टात काम करत होते. शनिवारी ते नेहमीप्रमाणे टपाल वाटप करून दुपारी दोन वाजता घरी आले. अचानक त्यांना प्रचंड ताप चढला व अस्वस्थ झाले. दरम्यान त्यांना एक खासगी वाहनाने अंबाजोगाई येथे दवाखान्यात हलविण्यात आले परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

यामुळे मिळू शकला नाही वैद्यकीय अहवाल..

विक्रम गायकवाड यांचा वाटेतच मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी त्यांना दवाखान्यात न नेता घरी आणले व अंत्यविधी केला. त्यामुळे वैद्यकीय अहवाल मिळू शकला नाही. विक्रम गायकवाड मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला? हे स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने व उन्हातून घरी आल्याने त्यांचा उष्माघातानेच मृत्यू झाला असल्याचे कुटुंबीयांकडून आणी आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. तापमान 43 अंशावर पोहोचले आहे. जिल्हा प्रशासनां कडून आवाहन करण्यात येत आहे. उन्हाचा पारा वाढला असून बाहेर फिरू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Loading...

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काय करावे..

- भरपूर पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा.

- फिक्कट रंगाचे सैल कपडे वापरा.

- उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.

- पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा.

- कुलर, ओलसर ताट्या, पंखा यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

काय करू नये...

- उन्हाच्या वेळेत बाहेर जाणे टाळा.

- पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.

- भडक रंगाचे, तंग कपडे वापरू नका.

- खूप प्रथिनयुक्त अथवा शिळे अन्न खाऊ नका.


पाण्यासाठी जीवाची बाजी, दुष्काळाचं भयाण वास्तव दाखवणारा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2019 02:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...