PPF, सुकन्या, NSC योजनेमध्ये पैसे जमा करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी बातमी!

PPF, सुकन्या, NSC योजनेमध्ये पैसे जमा करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी बातमी!

या तिमाहीत छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात बदल झाल्यामुळे आता जुने दर 1 ऑक्टोबर 2019 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लागू होतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर : पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम (Post Office Small Saving Scheme) , पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Scheme) आणि एनएससी (NSC) यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. टपाल कार्यालयाच्या छोट्या बचत योजनांच्या व्याज दरामध्ये (Interest rate) सरकारने कोणताही बदल केलेला नाही. सरकारी लहान बचत योजना म्हणजेच लहान बचत योजनेचे व्याज दर त्रैमासिक आधारावर होत असतो. पण यावेळी व्याज दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या तिमाहीत छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात बदल झाल्यामुळे आता जुने दर 1 ऑक्टोबर 2019 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लागू होतील.

छोट्या बचत योजनांचे व्याज दर

ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीच्या दरांमध्ये कोणताही बदल न झाल्याने सुकन्या समृद्धि खात्यात 8.4% व्याज मिळणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 8.6 टक्के दराने व्याज दिले जाईल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्स (एनएससी) यांना केवळ 7.9 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

इतर बातम्या- तिकीट न मिळाल्यामुळे भाजप नेत्याला अश्रू अनावर, भर सभेत ढसा-ढसा रडले

ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धि योजना अशा योजना आहेत. ज्या लहान गुंतवणूकदारांना चांगला फायदा देतात. या व्यतिरिक्त एक ते तीन वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटवर 6.9 टक्के दराने व्याज दर राहील. तसेच, 5 वर्षांच्या मुदतीच्या ठेवीसाठी 7.7 टक्के व्याज दर असेल. पोस्ट ऑफिसच्या रेकॉर्डिंग डिपॉझिट (आरडी) साठी 7.2 टक्के व्याज दर लागू असेल.

इतर बातम्या - उमेदवारी नाकारलेल्या भाजप कार्यकर्त्याचा संताप, पोस्टरवर लिहिलं...!

पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme Account (MIS) देखील 7.6 टक्के व्याज मिळवून देईल आणि किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Account) खात्यावर ग्राहकांना 7.6 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

इतर बातम्या - एका बकरीचा मृत्यू; कंपनीला कोट्यवधी रुपयांचा चुना, सरकारचेही लाखांचे नुकसान!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 01:27 PM IST

ताज्या बातम्या