मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

LPG Cylinder Price: आता सिलिंडरसाठी मोजावे लागतील तब्बल 1000 रुपये! जाणून घ्या काय आहे सरकारची योजना

LPG Cylinder Price: आता सिलिंडरसाठी मोजावे लागतील तब्बल 1000 रुपये! जाणून घ्या काय आहे सरकारची योजना

अनेक भागांत एलपीजी सिलिंडरसाठी मिळणारे अनुदान बंद करण्यात आलं आहे.

अनेक भागांत एलपीजी सिलिंडरसाठी मिळणारे अनुदान बंद करण्यात आलं आहे.

अनेक भागांत एलपीजी सिलिंडरसाठी मिळणारे अनुदान बंद करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर : आता एलपीजी सिलिंडरसाठी (LPG Cylinder latest price) ग्राहकांना 1 हजार रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार एलपीजी सिलिंडरवरचं अनुदान (LPG cylinder Subsidy) बंद करणार असल्याची शक्यता असून, अंतर्गत मूल्यांकनानंतर (Internal Assessment) याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत सरकारकडून अद्याप काहीही स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही.

एलपीजी सिलिंडरवर अनुदान देण्याच्या मुद्द्यावर मोदी सरकारने अनेकदा चर्चा केली आहे. परंतु अद्याप कोणतीही योजना तयार करण्यात आलेली नाही. याकरिता सरकारकडे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे सर्वांना कसल्याही अनुदानाशिवाय सिलिंडरचा पुरवठा करणं आणि दुसरा म्हणजे काही ग्राहकांसाठी सवलत कायम ठेवणं. त्यामुळं अनेक तर्क-वितर्क सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा (10 lakh Annual Imcome) नियम लागू केला जाईल. याशिवाय उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Scheme) लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळत राहील. उर्वरित ग्राहकांसाठी अनुदान सवलत (Subsidy) बंद केली जाईल, अशी शक्यता आहे. दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबांना एलपीजी कनेक्शन (LPG Connection) देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 साली उज्ज्वला योजना सुरू केली होती. ज्यांना शक्य असेल त्यांनी अनुदान घेणं स्वतःहून थांबवावं असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं होतं. त्यालाही उदंड प्रतिसाद देऊन लाखो जणांनी अनुदान घेणं बंद केलं होतं. सध्या देशात 29 कोटींहून अधिक एलपीजी कनेक्शन्स असून, उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे 8.8 कोटी एलपीजी कनेक्शन्स देण्यात आली आहेत.

महाराष्ट्राला मिळाला जागतिक पुरस्कार; पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी कौतुक

कोरोना विषाणूच्या साथीमुळे (Coronavirus Pandemic) जगभरात लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आला होता. त्या वेळी कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं एलपीजी अनुदानाच्या आघाडीवर सरकारला मदत झाली. त्यानंतर मे 2020 पासून, दुर्गम भाग आणि एलपीजी प्रकल्पापासून दूर असलेले ग्राहक वगळता अनेक भागांत एलपीजी सिलिंडरसाठी मिळणारे अनुदान बंद करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारनं 2021च्या आर्थिक वर्षात एलपीजी सिलिंडरच्या अनुदानाकरिता 3559 कोटी रुपये खर्च केले आहेत. आर्थिक वर्ष 2020 मध्ये हा खर्च तब्बल 24 हजार 468 कोटी रुपये होता. डीबीटी (DBT) योजनेअंतर्गत हा खर्च करण्यात आला आहे. जानेवारी 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत ग्राहकांना एलपीजी सिलिंडरसाठी पूर्ण रक्कम भरावी लागते. नंतर अनुदानाचे पैसे सरकारच्या वतीने थेट ग्राहकांच्या बँक खात्यात (Bank Account) जमा केले जातात.

First published:

Tags: LPG Price