नीरव मोदी, माल्यासारखं पळून न जाता 'या' ग्रामीण महिलांनी फेडलं 70 कोटींचं कर्ज

बँकांना फसवून कष्टकऱ्यांचा पैसा लुटणाऱ्या कर्जबुडव्या उद्योजकांमुळे देश होरपळून निघाला. अशाच कर्जबुडव्यांना आणि बँकांना अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी चांगलीच चपराक लगावली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 27, 2018 09:03 AM IST

नीरव मोदी, माल्यासारखं पळून न जाता 'या' ग्रामीण महिलांनी फेडलं 70 कोटींचं कर्ज

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी

अहमदनगर, 26 ऑक्टोबर : बँकांना फसवून कष्टकऱ्यांचा पैसा लुटणाऱ्या कर्जबुडव्या उद्योजकांमुळे देश होरपळून निघाला. अशाच कर्जबुडव्यांना आणि बँकांना अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी चांगलीच चपराक लगावली आहे. या महिलांनी विविध बँकांकडून घेतलेलं 70 कोटी रुपयांचं 90 टक्के कर्ज एकही हप्ता न चुकवता परत केलं.

नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय माल्या यांसारख्या कर्जबुडव्यांनी हजारो कोटींचं कर्ज बुडवून देशातून पलायन केलं. मात्र याच देशात असेही काही कर्जदार आहेत ज्यांनी आतापर्यंत घेतलेल्या कर्जाची 70 टक्के परतफेडही केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांनी हा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे. चौथी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सीमा मोरे यांनी दू्ग्ध व्यवसाय सुरू केला. 17 लिटर दुधापासून सुरू केलेला हा व्यवसाय आज 300 लिटरपर्यंत गेला आहे.

LIVE CCTV: तो चोरट्या पावलांनी आला आणि 1 लाखाची रोकड घेऊन गेला!

राजकीय क्षेत्रात सरपंचपदी महिलांची नियुक्ती हे नवं नाही आहे. पण चिंचोलीच्या वंदना उबाळे यांनी सुरूवातीला बचतगट सुरू केला. महिलांचा संपर्क वाढवत त्यांचा प्रवास सरपंचपदापर्यंत आला. त्यानंतर त्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत गॅस वाटप केलं. गॅस मिळत नसल्याने बँकेकडून कर्ज घेत घरपोच गॅस वितरण सुरू केलं.

ताई जाधव यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी 1 लाखांचं कर्ज बँकेकडून घेतलं होतं. मुलीनं विणकाम आणि शिवणकामाचं शिक्षण घेत स्वत: विणलेल्या वस्तू विकून 90 टक्के कर्जाची परतफेड केली आहे.

महिलांची प्रगती साधण्यासाठी या यंत्रणेने महिलांना कर्जाचा पुरवठा केला. अहमदनगर जिल्ह्यात 224 गावांत 2490 बचतगट असून 70 कोटी रूपयांचं कर्ज वाटप आतापर्यंत करण्यात आलं आहे. त्यापैकी 90 टक्के कर्जाची परतफेड या महिलांनी पूर्ण केली आहे.

VIDEO: प्रणिती शिंदेंची जीभ घसरली, भाजप खासदाराला म्हणाल्या बेवडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2018 09:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close