ठंडा-ठंडा कूल-कूल! एका पोर्टेबल एसीनं करा सगळं घर थंडगार...

ठंडा-ठंडा कूल-कूल! एका पोर्टेबल एसीनं करा सगळं घर थंडगार...

उकाड्यावर उपाय म्हणून लोक एअर कूलर (Air Cooler) किंवा एअर कंडीशनरकडे वळत आहेत. एअर कंडीशनरमध्ये (Air Conditionaer-AC0) विंडो एसी आणि स्प्लिट एसी असे प्रमुख पर्याय असतात.

  • Share this:

मुंबई, 6 मे : देशात सध्या एकीकडं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप असताना दुसरीकडे सूर्यदेवाचाही कहर सुरू आहे. तापमानाचा पारा बहुतांश ठिकाणी चढाच आहे. त्यामुळे उकाड्यानं लोक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी तर गरमी (Hot) प्रचंड जाणवत असून घामाच्या धारा(Sweating) लागत आहेत. त्यामुळे या उकाड्यावर उपाय म्हणून लोक एअर कूलर (Air Cooler) किंवा एअर कंडीशनरकडे वळत आहेत. एअर कंडीशनरमध्ये (Air Conditionaer-AC0) विंडो एसी आणि स्प्लिट एसी असे प्रमुख पर्याय असतात. एखाद्या घरात माणसे जास्त असतील किंवा घरात खोल्या जास्त असतील तर प्रत्येकासाठी किंवा प्रत्येक खोलीत एक वेगळा एसी बसवावा लागेल किंवा मग संपूर्ण घर सेंट्रलाईज्ड एसी करून घ्यावं लागेल. अर्थात सर्वांना हे परवडेल असे नाही. त्यामुळे अनेकजण नाईलाजानं उन्हाळा असाच घामाच्या धारांनी भिजत घालवतात; पण आता यावर परवडणारा आणि सगळ्यांना थंडावा देणारा एक अभिनव उपाय उपलब्ध झाला आहे. हा पर्याय आहे पोर्टेबल एसीचा. पोर्टेबल एसी घेऊन तुम्ही तुमचं सगळं घर थंडगार करू शकता.

पोर्टेबल एसीचा वापर सहजसोपा

हा पोर्टेबल एसी कुठेही सहजपणे सेट करता येतो आणि तो कुठेही नेता येतो. तुम्ही एक पोर्टेबल एसीघेऊन तो अख्ख्या घरात हवा तिथं नेऊन थंडावा पसरवू शकता. याचा आकार अतिशय कॉम्पॅक्ट असतो. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत हा अगदी सहज नेता येतो. पोर्टेबल एसी तुमच्या खिडकीत असलेल्या एका ट्यूबद्वारे खोलीतील गरम हवा बाहेर टाकते. आर्द्रतेची आवश्यक पातळी राखण्यास देखील याची मदत होते. पंख्याचा वेग आणि तापमान यासारख्या बाबी तुम्ही नियंत्रित करू शकता. विंडो एसीला हा एक चांगला पर्याय आहे.

हे ही वाचा-Youtube चं नवं फीचर; आता युट्युबवर आपल्या भाषेत सर्च करता येणार Video

सर्वोत्कृष्ट पोर्टेबल एअर कंडिशनर

फ्रीगिडेयर (Frigidaire) कंपनीचा पोर्टेबल एअर कंडिशनर रिमोटसह येतो. यात डीह्युमिडी फाइंग, एअर सस्पेंशन फीचर्ससह टाइमर ऑप्शन तसंच स्लीप मोडही आहे. यात तीन वेगळा स्पीड असणारा फॅनअसून, 350चौरस फूट आकारमानाच्या खोल्या याच्या सहायानं सहज थंड करता येतात. याचे वजन फक्त 62 पाउंडपेक्षा थोडेसे जास्त आहे.

अॅमेझॉन बेसिक्सचे नो-फ्रिल्स पोर्टेबल युनिट 400चौरस फूट आकाराची खोली थंड करू शकते आणि इतर मॉडेल्सच्या तुलनेत हे बरेच स्वस्त आणि वजनालाही हलके (52 पाउंड) आहे. रिमोट कंट्रोलसह एलईडी डिस्प्लेअसून स्पीड, कुलिंग लेव्हल आणि टायमर सेट करता येतो. ऑफिसमधील केबिन्स आणि लहान खोल्यांसाठी ब्ल्यूस्टारचा एक टनचा पोर्टेबल एसी येतो. यातील उच्च कार्यक्षमतेच्या रोटरी कॉम्प्रेसरमुळे कमी ऊर्जा वापरुन जास्तीत जास्त कूलिंग होते. यातील अँटी-फ्रीझ थर्मोस्टॅट हे सुरक्षा वैशिष्ट्यही खास आहे.

First published: May 6, 2021, 10:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या