पोर्न व्हिडिओ पाहून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने केलं विकृत कृत्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोर्न व्हिडिओ पाहून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने केलं विकृत कृत्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुलीची आई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेल्याचं पाहून आरोपीने घरातून पळ काढला होता.

  • Share this:

भोपाळ, 20 फेब्रुवारी : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका 5 वर्षांच्या चिमुरडीसोबत अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी इंजिनियअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. हा विकृत तरूण पोर्न व्हिडिओ पाहण्याच्या आहारी गेला होता, त्यातून त्याने हे कृत्य केलं.

ही घटना भोपाळ येथील कोलार परिसरात घडली. विरेंद्र परिहार असं या नराधमाचं नाव आहे. पोलिसांनी 5 वर्षांच्या चिमुरडीसोबत अत्याचार करणारा 24 वर्षीय  विरेंद्र परिहार  हा पीडितेचा शेजारीच राहत होता. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली.

पीडित मुलगी कॉलनीमध्ये खेळत होती. त्यावेळी तिची आईसुद्धासोबत होती. परंतु, तिला पतीचा फोन आल्यामुळे ती बोलत घरात गेली. थोड्यावेळानंतर आई बाहेर आली आली. त्यावेळी आईने मुलीला आवाज दिला असता ती  समोरच्या घराच्या छतावरून रडत खाली उतरली.

मुलगी रडत आल्याचं पाहून आईने तिला विचारले असता धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपी तरुणाने पीडित मुलीला कबूतर दाखवण्याच्या बहाण्याने घरात घेऊन गेला आणि त्यानंतर त्याने तिच्यावर दुष्यकृत्य केलं. मुलीने सांगितलेल्या माहितीनंतर आईने थेट पोलीस स्टेशन गाठले.

कोलार पोलीस स्टेशनमध्ये आईने या नराधम तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात भादवी कलम 376, 376(3)  आणि 5/6 पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेल्याचं पाहून आरोपीने घरातून पळ काढला होता. परंतु, पोलिसांनी मोठ्या शिताफीने या नराधमाच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरेंद्र परिहार हा मुळचा बैतूल जिल्ह्यातील मुलताई इथं राहणार आहे. भोपाळमध्ये कोलार परिसरात तो श्रीराम कॉलेजमध्ये इंजिनियरिंगचं शिक्षण घेण्यासाठी आला होता. या तरुणाचे बीईचे अंतिम वर्ष आहे. पोलिसांनी जेव्हा या नराधमाची चौकशी केली तेव्हा त्याने आपण पोर्न व्हिडिओ पाहण्याच्या आहारी गेलो असल्याचं कबूल केलंय. यातून हे कृत्य केल्याचंही त्याने सांगितलं.

First published: February 20, 2020, 10:05 PM IST
Tags: Rape

ताज्या बातम्या