Home /News /news /

Pomegranate production : सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संकटात; करोडोंचं नुकसान होण्यामागे हे आहे कारण

Pomegranate production : सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संकटात; करोडोंचं नुकसान होण्यामागे हे आहे कारण

सोलापूर जिल्हा (Solapur district Pomegranate production) हा डाळिंब उत्पादनातील बालेकिल्ला मानला जातो.

  सोलापूर, 25 मे : राज्यातील डाळिंब बागायतदारांना (Pomegranate production) सिझनच्या सुरूवातीपासून विविध कारणांनी फटका बसत आहे. दरम्यान मागच्या चार दिवसांपूर्वी झालेल्या मान्सून पूर्व पावसाने डाळिंब बागायतदारांना मोठा फटका बसला आहे.  सोलापूर जिल्हा (solapur district Pomegranate production) हा डाळिंब उत्पादनातील बालेकिल्ला मानला जातो. मात्र किडींचा प्रादुर्भाव (Insect infestation) वाढल्याने गेल्या वर्षभरापासून डाळिंबाच्या बागांना नुकसान सहन करावे लागत आहे. दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे डाळिंब उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  अवकाळी पाऊस आणि किडीच्या प्रादुर्भावापासून बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र वाढत्या उष्णतेचा परिणाम बागांवर होत आहे. वाढत्या तापमानामुळे फुलकळी लागताच ती खाली गळून पडत आहेत. यासोबतच पिनहोल बोअर किडींचा प्रादुर्भावही झपाट्याने वाढत आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात 40 अंशांच्या पुढे तापमान गेल्याने ही परिस्थिती ओढावत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब शेतकरी चिंतेत असून, कृषी विभागाकडे मदतीची विनंती करत आहेत.

  हे ही वाचा : monsoon update : मुंबईकरांची heat wave पासून सुटका नाहीच, मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता

  नाशिक जिल्ह्यात ही अशीच परिस्थिती होत आहे. तापमान ४० च्या पुढे गेल्याने डाळिंबाची झाडे खराब होत असून, वाढत्या तापमानामुळे इतर फळांचीही नासाडी होत आहेत. उन्हाच्या तडाख्याने फळांवर पांढरे डाग दिसून येत आहेत. त्यामुळे उन्हापासून फळे वाचवण्यासाठी शेतकरी आटापिटा करत आहे. या डागांचा फळबागांवर विपरीत परिणाम होत असून फळांचा दर्जाही घसरत चालला आहे.

  दरम्यान सोलापूर जिल्ह्याती शेतकरी फळांच्या बागा वाचवण्यासाठी गरजेनुसार घरातील जुन्या साड्या व कपडे वापरून शेतकरी छोटी झाडे झाकत आहेत. याशिवाय कीटकनाशकांची फवारणीही करत आहेत. उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी शेतकरी रात्रीच्या वेळी फळबागांना पाणी घालत आहेत. यामुळे थोडासा दिलासा मिळत असल्याचे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

  किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी अस्वस्थ

  या वर्षी डाळिंब बागांवर पिनहोल बोअर किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या फळबागा नष्ट कराव्या लागत आहेत. या किडींमुळे सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वाढता प्रादुर्भाव पाहून कृषी विभागाने यासाठी नियोजन सुरू केले असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येत आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Farmer protest, Solapur (City/Town/Village), Solapur news

  पुढील बातम्या