Polls of Exit Polls - कोलकाता, 29 एप्रिल : पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं. बहुतांश एग्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. कोरोनाच्या संकटात देशातील चार राज्यात आणि एक केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक पार पडली. त्यात पश्चिम बंगालसाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. अगदी अमित शहांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सामील झाले होते. पश्चिम बंगालमध्ये 294 जागांवर झालेल्या विधानसभा निवडणूक बहुमतासाठी 148 जागा आवश्यक आहेत.
त्यातही ETG Research, P-MARO, ABP News C Voter या संस्थांनुसार TMC ला सर्वाधिक जागा मिळतील. मात्र Republic TV-CNX च्या आकडेवारीनुसार भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालवर कोण मोहोर लगावणार हे येत्या 2 मे रोजी मतमोजणीच्या दिवशी समोर येईल.
हे ही वाचा-ममता दीदीं पुढे मोदींचं मॅजिक फेल, तृणमूल पुन्हा एकदा किंग
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे सर्व देशाचं लक्ष आहे. आज आलेल्या एग्झिट पोलच्या निकालामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून बरेच प्रयत्न करीत होती. अमित शहा, नरेंद्र मोदींपासून अनेक नेते या निवडणुकीत सामील झाले होते. कोरोनाचा कहर असतानाही पश्चिम बंगालमध्ये मात्र रॅली, प्रचाराचं वातावरण होतं. मात्र तरीही पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी पुन्हा एकदा क्वीन ठरल्या आहेत. ममता दीदींच्या तृणमृलला एग्जिट पोलमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या एग्जिट पोलमध्ये ममता दीदींच्या तृणमूलला 152 ते 164 जागा मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर भाजपला केवळ 109-121 जागा मिळाल्या आहेत. कोणत्याही पक्षाला विजयासाठी कमीत कमी 148 जागांची गरज आहे. त्यामुळे एग्जिट पोलच्या निकालानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता दीदींचा विजय झाल्याचं समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, BJP, Narendra modi, TMC, West bangal