मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

PUNE : मी फक्त अभिनेते मोहन जोशींना ओळखतो, काँग्रेस नेत्याच्या टीकेवर महापौरांची शेलकी कोटी!

PUNE : मी फक्त अभिनेते मोहन जोशींना ओळखतो, काँग्रेस नेत्याच्या टीकेवर महापौरांची शेलकी कोटी!

Pune Vaccine Politics कोण मोहन जोशी? मला तर फक्त सिनेअभिनेते मोहन जोशी हेत माहिती आहेत, अशी शेलकी कोटी करत मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेस नेत्यांना उत्तर दिलं.

Pune Vaccine Politics कोण मोहन जोशी? मला तर फक्त सिनेअभिनेते मोहन जोशी हेत माहिती आहेत, अशी शेलकी कोटी करत मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेस नेत्यांना उत्तर दिलं.

Pune Vaccine Politics कोण मोहन जोशी? मला तर फक्त सिनेअभिनेते मोहन जोशी हेत माहिती आहेत, अशी शेलकी कोटी करत मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेस नेत्यांना उत्तर दिलं.

पुणे, 31 मे : कोरोनाच्या (Coronavirus) संकटातून काहीसा दिलासा मिळत असल्याचं चित्र असताना आता लसीचा मुद्दा (Vaccine Issue) आणि त्यावरील राजकारण पेटलं आहे. पुण्यातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी पुण्यात लसीचा तुटवडा (Pune Vaccine Shortage) असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांवर बोचरी टीका केली. मात्र त्याला उत्तर देताना पुण्याच्या महपौरांनी काँग्रेस नेत्यांना ओळखतच नसल्याचं सांगत, पलटवार केला आहे. (वाचा-महत्त्वाची बातमी! 1 जूनपासून राज्यात नवे नियम, पाहा तुमच्या जिल्ह्यात किती सूट?) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पुण्यात ज्या वेगानं कोरोना रुग्णांची संख्या पाहायला मिळत होती, ती पाहता भविष्यात परिस्थिती गंभीर होऊ नये म्हणून लसीकरणावर भर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुण्यातील प्रशासनही प्रयत्न करत आहे. मात्र पुण्यातील काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी लसींच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केल्याचं पाहायला मिळालं. सीरम इनस्टिट्यूट पुणे मनपाला 25 लाख डोस द्यायला तयार आहे. मात्र असं असूनही केवळ भाजप नेत्यांमधील अंतर्गत कलहामुळं केंद्र सरकारची परवानगी मिळत नसल्याची टीका मोहन जोशी यांनी केली आहे. पुण्याचे असलेले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि खासदार गिरीष बापट या दोघांची पुणेकरांना लस मिळवून देण्याइतकीही दिल्लीत पत राहिली नाही का? अशी बोचरी टीका मोहन जोशी यांनी केलीय. (वाचा-Big News : संभाजीराजे छत्रपती यांची हेरगिरी! ट्विट करत म्हटले काय साध्य होणार?) काँग्रेस नेते मोहन जोशींना प्रत्युत्तर देण्यासाठी पुण्याचे महपौर मुरलीधर मोहोळ लगेचच सरसावले आहेत. पण त्यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीनं मोहन जोशींवर टीका केली. कोण मोहन जोशी? मला तर फक्त सिनेअभिनेते मोहन जोशी हेत माहिती आहेत, अशी शेलकी कोटी करत त्यांनी काँग्रेस नेत्यांना उत्तर दिलं. पुणेकरांना कळकळीची विनंती... पुण्यामध्ये नागरिकांना मोठा दिलासा देत स्थानिक प्रशासनानं बहुतांश निर्बंध उठवले आहेत. मात्र नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. पुणे शहरात आपण बहुतांशी निर्बंध शिथिल केलेले असले तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. आपल्याला तिसरी लाट सामूहिकपणे रोखायचीय, पण ते तुम्हा सर्वांच्या साथीशिवाय शक्य नाही. बाहेर वावरताना प्रचंड काळजी घ्या. स्वतः सुरक्षित राहा, कुटूंबालाही ठेवा! असा संदेश महापौरांनी दिला आहे.
First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus, Pune news

पुढील बातम्या